शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

पीएच.डी.साठी ठरला लॉकडाऊन सुकाळ; सात महिन्यांत दोनशेहून अधिक विद्यार्थी ठरले संशोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 15:44 IST

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठस्तरावर एक अध्यादेश जारी करुन संशोधक विद्यार्थ्यांची ‘ऑनलाईन व्हायवा’ घेण्याची प्रक्रिया सुरू केली.

ठळक मुद्देएकाही संशोधक विद्यार्थ्याचा शोधप्रबंध नाकारुन तो पुन्हा नव्याने संशोधन करण्याची वेळ आली नाही. साधारणपणे जूनपासून ऑनलाईन मुलाखत घेण्याची जबाबदारी विभागप्रमुखांऐवजी अधिष्ठातांकडे सोपविण्यात आली.

औरंगाबाद : लॉकडाऊन काळात देशभरातील अर्थ, उद्योग, शिक्षण असे सर्वच क्षेत्र प्रभावित झाले. असे असले तरी लॉकडाऊनच्या काळातील सात महिन्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी पीएच.डी. ही शिक्षणक्षेत्रातील सर्वोच्च पदवी प्राप्त केल्याची बाब समोर आली आहे.

यासंदर्भात समजलेली माहिती अशी, लॉकडाऊनमध्ये संपूर्ण शिक्षण व्यवस्था ठप्प झाली होती. मात्र, दरम्यानच्या काळात अनेक संशोधक विद्यार्थ्यांनी आपले संशोधन पूर्ण करून अंतिम शोधप्रबंध विद्यापीठाला सादर केलेला होता. मात्र, बाहेरील विद्यापीठे किंवा महाविद्यालयांमधील संबंधित विषयांचे तज्ज्ञ संशोधक विद्यार्थ्यांच्या मुलाखती (व्हायवा) घेण्यासाठी लॉकडाऊनमुळे औरंगाबादेत येऊ शकत नव्हते. त्यासाठी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठस्तरावर एक अध्यादेश जारी करुन संशोधक विद्यार्थ्यांची ‘ऑनलाईन व्हायवा’ घेण्याची प्रक्रिया सुरू केली. साधारणपणे जूनपासून ऑनलाईन मुलाखत घेण्याची जबाबदारी विभागप्रमुखांऐवजी अधिष्ठातांकडे सोपविण्यात आली.

असे बोलले जाते की, अनेकदा ‘ऑनलाईन व्हायवा’ मध्ये संबंधित विषय अथवा विभागांचे शिक्षक किंवा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होत नव्हते. त्यामुळे संशोधनातील बारकाव्याविषयी कोंडीत पकडण्याचे फारसे प्रयत्नही झाले नाहीत. परिणामी, ‘व्हायवा’ देणाऱ्यांपैकी एकाही संशोधक विद्यार्थ्याचा शोधप्रबंध नाकारुन तो पुन्हा नव्याने संशोधन करण्याची वेळ आली नाही. दोनशेहून अधिक संशोधक विद्यार्थ्यांनी पीएच. डी. प्राप्त केली. लॉकडाऊनचा काळ हा पीएच.डी. पदवी घेण्यासाठी सुकाळ ठरला, असेही थट्टेने विद्यापीठ वर्तुळात बोलले जात आहे.

आता ‘व्हायवा’ची जबाबदारी विभागप्रमुखांवरविद्यापीठाच्या खास सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, लाॅकडाऊनमध्ये पीएच.डी.चा ‘व्हायवा’ घेण्याची जबाबदारी अधिष्ठातांवर सोपविण्यात आली होती. मात्र, अलीकडेच एका अधिष्ठाताने संशोधक विद्यार्थ्याला अरेरावीची भाषा वापरल्यामुळे त्या उद्विग्न झालेल्या विद्यार्थ्याने कुलगुरुंकडे तक्रार केली. त्यामुळे अधिष्ठातांकडे ‘व्हायवा’ची दिलेली जबाबदारी पूर्वीप्रमाणे विभागप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. तसेही अधिष्ठातांकडे प्रवेशप्रक्रियेपासून परीक्षेपर्यंतच्या कामाचा भार असतो. त्यामुळे ‘व्हायवा’च्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येते.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण