शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

Lockdown In Aurangabad : संचारबंदीत उद्योग सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:00 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीत लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसंदर्भात  सूचना देताना देसाई यांनी उद्योग क्षेत्र सशर्त सुरू ठेवण्याबाबत सूचना दिल्या.

ठळक मुद्दे आरोग्यासह उद्योग अर्थचक्र सुरू राहणे महत्त्वाचे

औरंगाबाद : शहर आणि वाळूज औद्योगिक परिसरात १० ते १८ जुलैदरम्यान लागू होणाऱ्या लॉकडाऊनदरम्यान उद्योग सुरू ठेवण्यासाठी सशर्त परवानगी असल्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी सांगितले. शासनाचे उद्योगाबाबतचे धोरण आहे, त्याला अनुसरून पालकमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीत लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसंदर्भात  सूचना देताना देसाई यांनी उद्योग क्षेत्र सशर्त सुरू ठेवण्याबाबत सूचना दिल्या.

औद्योगिक संघटनांकडून आभारउद्योगांसाठी थोडीफार का होईना सवलत दिल्याबद्दल सर्व औद्योगिक संघटनांचे मानसिंग पवार, कमलेश धूत, अभय हंचनाळ, मुकुंद कुलकर्णी यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. चिकलठाणा, वाळूज, रेल्वेस्टेशन, एमआयडीसीऔरंगाबाद शहराव्यतिरिक्त इतर एमआयडीसी किंवा खासगी जागेवरील उद्योग चालू राहणार असल्यामुळे त्यांना आवश्यक ते पास देऊन कामगारांची वाहतूक निश्चित बसने करता येईल. जे उद्योग कामगारांची दहा दिवस कंपनीमध्ये निवास व्यवस्था करणार, त्यांना उद्योग सुरू ठेवण्यास कोणतीही अडचण नाही.दरम्यान शेतमाल, कृषी निगडित प्रक्रिया उद्योग नियमानुसार चालू राहतील, असे मनपा आयुक्तांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे.

एमआयडीसी पोर्टलच्या परवानग्या ग्राह्यजिल्ह्यात औषध व अन्न उत्पादन, सलग प्रक्रिया आणि निर्यात उद्योग व त्यांचे पुरवठादार चालू राहणार व यासाठी एमआयडीसी पोर्टलवरून यापूर्वी देण्यात आलेल्या परवानग्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत, तसेच औरंगाबाद शहरामधून उद्योग क्षेत्रामध्ये आणि परतीसाठी फक्त कार किंवा निश्चित बसमधूनच प्रवासाला परवानगी राहील.चिकलठाणा, वाळूज, रेल्वेस्टेशन एमआयडीसी व औरंगाबाद शहराव्यतिरिक्त इतर एमआयडीसी किंवा खाजगी जागेवरील उद्योग चालू राहणार आहेत. जे उद्योग समूह कामगारांची १० दिवस कंपनीत निवास व्यवस्था करणार आहेत, त्यांना उद्योग चालू ठेवण्यास कोणतीही अडचण येणार नाही, तसेच शेतमालाशी निगडित प्रक्रिया उद्योगही चालू राहणार. औद्योगिक क्षेत्रानजीकच्या खेड्यांमधील कामगारांची वाहतूक कार किंवा बसने सुरू राहणार आहे. आरोग्याबरोबरच अर्थचक्र चालू राहणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री देसाई यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी