शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

टँकर वाढीसाठी लॉबी सक्रिय

By admin | Updated: May 8, 2017 00:25 IST

बीड : ग्रामीण भागात टंचाई असल्याचे भासवून टँकरची संख्या वाढविण्यासाठी टँकर लॉबी सक्रीय झाली आहे.

व्यंकटेश वैष्णव ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ग्रामीण भागात टंचाई असल्याचे भासवून टँकरची संख्या वाढविण्यासाठी टँकर लॉबी सक्रीय झाली आहे. दोन दिवसापूर्वी बीड तालुक्यातील एका गावचा टँकर मागणीचा प्रस्ताव स्थळ पहाणी नंतर रद्द करण्यात आला. कृत्रीम पाणी टंचाई निर्माण करून टँकर वाढविण्याचा उद्योग सुरू केला आहे. मात्र दोन दिवसापूर्वीच जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी टँकर मंजूरी संदर्भात समन्वय समिती स्थापन केली आहे.गतवर्षी पावसाळ्याच्या शेवटच्या टप्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे जलयुक्त योजने अंतर्गत झालेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा झाला होता. २०१५ - १६ मध्ये जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असल्याने सातशेवर टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला होता. यंदाची जिल्ह्यातील स्थिती वेगळी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पिण्याच्या पाण्याची बऱ्यापैकी स्थिती आहे. परंतु जिल्ह्यातील टँकर लॉबी टँकरची संख्या वाढविण्यासाठी सरसावली आहे. काही गावातील सरपंच व ग्रामसेवकांना हाताशी धरून संबंधीत गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याचे चित्र निर्माण करण्याचा उद्योग केला जात असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.सद्यस्थितीत बीड जिल्ह्यात एकूण ११ टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यामध्ये धारूर तालुक्यात ६ , पाटोदा १, केज १ यासह इतर ठिकाणी ३ असे एकूण ११ टँकर सुरू आहेत. यामध्ये विश्वासनीय सुत्राने दिलेल्या माहितीनुसार ११ पैकी ७ टँकर शासनाचे आहेत. काही गावांमध्ये मात्र खरोखरच पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. तेथे टँकर सुरू आहेत.