शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

शहरात लोडशेडिंग अटळ

By admin | Updated: June 14, 2016 00:12 IST

औरंगाबाद : भारनियमनमुक्त असलेल्या औरंगाबाद शहरालाही आता लोडशेडिंगचे चटके बसणार आहेत

औरंगाबाद : भारनियमनमुक्त असलेल्या औरंगाबाद शहरालाही आता लोडशेडिंगचे चटके बसणार आहेत. वीज चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे महावितरणच्या परिमंडळ कार्यालयाने शहरात पुन्हा लोडशेडिंग लागू करण्याची तयारी चालविली आहे. परिमंडळ कार्यालयाकडून सध्या तसा प्रस्ताव तयार केला जात आहे. परिस्थितीत फारसा बदल न झाल्यास दोन महिन्यांतच लोडशेडिंग लागू करावी लागेल, असे खुद्द महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळ कार्यालयाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सोमवारी स्पष्ट केले. औरंगाबाद शहरात मागील काही महिन्यांपासून वीज गळतीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. सध्या हे प्रमाण ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. यामध्ये यंत्रणेतील दोषामुळे होणारी हानी आणि वीज चोरी या दोन्हीचा समावेश आहे. चोरी थांबवून वीज गळती कमी करण्यासाठी महावितरण कंपनीने महिनाभरापूर्वी दहा भरारी पथके स्थापन केली. या पथकांनी शहरातील विविध भागांत सुमारे १६० जणांवर दंडात्मक कारवाई केली; परंतु त्यानंतरही गळतीचे प्रमाण कमी झालेले नाही. सद्य:स्थितीत शहरातील ८४ पैकी केवळ ८ फिडरवरच वीज चोरी नाही. उर्वरित सर्व ७६ फिडरवर वीज चोरी होत आहे. महावितरण कंपनीच्या धोरणानुसार वीज चोरीचे प्रमाण अधिक असलेल्या ठिकाणी लोडशेडिंग लागू केले जाते. त्यानुसार आता परिमंडळ कार्यालयाने औरंगाबाद शहरातही लोडशेडिंग लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यासाठी तसा प्रस्तावच या कार्यालयाकडून बनविला जात आहे. याविषयी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, शहरात वीज चोरीचे प्रमाण खूपच अधिक आहे. शिवाय हे प्रमाण जवळपास सर्वच फिडरवर आहे. महिनाभरात आम्ही पथकांमार्फत दीडशेहून अधिक कारवाया केल्या. तरीही वीज चोरी कमी झालेली नाही. त्यामुळे आता आम्ही लोडशेडिंगचा विचार करीत आहोत. तसा प्रस्तावही तयार केला जाणार आहे. वीज चोरी कमी करण्याचा प्रयत्न सध्याही सुरूच आहे. त्याला आणखी गतिमान केले जाईल; परंतु दोन महिन्यांत परिस्थिती बदलली नाही तर लोडशेडिंगची अंमलबजावणी करावीच लागेल. त्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय असणार नाही. महावितरण कंपनीने सहा वर्षांपूर्वी राज्यातील महसुली मुख्यालयाची शहरे भारनियमनमुक्त घोषित केली. तेव्हापासून औरंगाबाद शहरात लोडशेडिंग बंद झाले आहे. ४काही वर्षांपूर्वी शहरात वीज गळतीचे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांच्या आत होते. मात्र, आता हे प्रमाण ४५ टक्के झाले आहे. त्यामुळे आता भारनियमनमुक्तीपासून पुन्हा एकदा भारनियमन सक्तीचा प्रवास सुरू झाला आहे. महावितरण कंपनीने महिनाभरात शहरात वीज चोरांविरुद्ध कारवाईची धडक मोहीम राबविली. यामध्ये वीज चोऱ्या तर पकडण्यात आल्याच; परंतु त्यासोबतच आतापर्यंत बिलच आकारले जात नसलेले काही ग्राहकही आढळून आले.