शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

नाथसागरात महिनाभर पुरेल एवढा जिवंत जलसाठा

By admin | Updated: June 30, 2014 01:03 IST

औरंगाबाद : नाथसागरात (जायकवाडी धरण) एक महिना पुरेल एवढा उपयुक्त (जिवंत) जलसाठा आहे.

औरंगाबाद : नाथसागरात (जायकवाडी धरण) एक महिना पुरेल एवढा उपयुक्त (जिवंत) जलसाठा आहे. त्यानंतर मृतजलसाठ्यातून पाणी उपसा करावा लागेल. पाऊस लांबला तर शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांवर पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. पावसाळा लांबला तर तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक पालिकेला करावे लागण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने आज मनपाचे पदाधिकारी आणि अभियंत्यांनी नाथसागराची पाहणी केली. डाव्या कालव्याशेजारी १४०० आणि ७०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीसाठी पंपांद्वारे पाणी उपसले जाते. त्या पंपांच्या तोंडाशी गवताचे जाळे झाल्यामुळे पाण्याचा उपसा कमी होतो आहे. परिणामी पाणीटंचाई जाणवत आहे. शहरातील काही वॉर्डांमध्ये पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी वाढल्या आहेत. जायकवाडीत सध्या पाणीसाठा आहे; परंतु शहरात पाणी येण्यात अनेक अडचणी आहेत. जलवाहिन्यांची गळती, उपसा पंपाजवळ आलेले गवत, यामुळे कमी प्रमाणात पाणी उपसले जात आहे. शहरात पाण्याची मागणी वाढलेली आहे. नाथसागरात एक महिना पुरेल एवढा जिवंत जलसाठा आहे. त्यानंतर मृत जलसाठ्यातून पाणी घ्यावे लागणार आहे, असे महापौर कला ओझा यांनी सांगितले. आढावा महापौर कला ओझा यांनी आज उपमहापौर संजय जोशी, सभापती विजय वाघचौरे, सभागृह नेते किशोर नागरे, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, वीरभद्र गादगे, नगरसेवक महेश माळवतकर, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता यू.जी. शिरसाठ, वसंत निकम यांच्यासह धरणातील पाण्याचा व उपसा पंप केंद्राचा आढावा घेतला.अपव्यय टाळावाशहराला गतवर्षी केलेल्या अ‍ॅप्रोच चॅनलमुळे पाणीपुरवठा होईल. त्यामुळे सध्या तरी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार नाही. मात्र, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, अपव्यय टाळावा, असे आवाहन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले. धरणातील पाणीसाठा४४५६.०७३ मीटरजिवंत जलसाठा४८७.६०९ एम.एम.क्युब शहराची पाण्याची गरज४रोज २०० एमएलडी४येते १३० एमएलडीपाण्याचे स्रोत४हर्सूल तलाव, जायकवाडी, विहिरी, हातपंप गवत काढण्याचे काम सुरूउपसा पंपांजवळ आलेले गवत पाणबुड्यांच्या मदतीने काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पंपांच्या तोंडाशी गाळ अडकल्यास पाणी उपसण्यास अडचणी येतात, असे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सांगितले