शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

साहित्य आले, मात्र लाभार्थीच मिळेनात !

By admin | Updated: January 8, 2017 00:13 IST

जालना :जालना : मागासवर्गीय प्रवर्गातील कुटुंबांची आर्थिक प्रगती व्हावी म्हणून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने उपकरातून विविध साहित्य खरेदी करून त्याचे वितरण केले जाते.

जालना : मागासवर्गीय प्रवर्गातील कुटुंबांची आर्थिक प्रगती व्हावी म्हणून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने उपकरातून विविध साहित्य खरेदी करून त्याचे पंचायत समितीमार्फत संबंधित लाभार्थ्यांना वितरण केले जाते. त्यानुसार जिल्हा परिषदेमार्फत सर्व पंचायत समित्यांना या साहित्याचे वाटपही झाले आहे. परंतु, महिना उलटला तरी लाभार्थ्यांच्या याद्याच मिळाल्या नसल्याने हे साहित्य पंचायत समिती आवारातच वाटपाविना पडून आहे. जिल्ह्यातील मागास प्रवर्गातील एसटी, व्हीजेएनटी या प्रवर्गातील कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीसाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने उपकरातून विशेष निधी ठेवला होता. त्यानुसार गत सप्टेंबरमध्ये या प्रवर्गातील नागरिकांकडून मिनी दाळ मिल, डिझेल इंजिन, पाण्याची मोटार, पिठाची गिरणी या साहित्यांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते.या योजनाचा लाभ मिळावा म्हणून या प्रवर्गातील अनेकांनी प्रस्ताव सादर केले होते. त्यामुळे प्रस्तावांची संख्या जवळपास ४ हजार झाली होती. या प्रस्तावांची छाननी करण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने निविदेद्वारे ३७ मिनी दाळ मिल, १०० डिझेल इंजिन, दीडशेच्या जवळपास पाण्याच्या मोटारी आणि ३०० पेक्षा जास्त पिठाची गिरणी या साहित्यांची खरेदी करण्यात आली. यात एका मिनी दाळमिलची किंमत ८० हजार, डिझेल इंजिनची किंमत २४ हजार, पाण्याची मोटार २२ हजार तर पिठाच्या गिरणीचा दर १५ हजार रुपये आहे.हे साहित्य पुरवठादाराकडून उपलब्ध झाल्याने समाजकल्याण विभागाने जालना तालुक्यासह अंबड, परतूर, जाफराबाद, भोकरदन, मंठा, घनसांगवी येथील पंचायत समित्यांकडे डिसेंबरमध्येच याचे वितरण केले. मात्र, महिना उलटला तरी अद्यापही लाभार्थ्यांची निवड करुन सदरील लाभार्थ्यांच्या याद्या पंचायत समितीकडे पाठविल्या नाहीत. परिणामी, हे साहित्य धूळखात पडून असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)