शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

'आवडीचे संगीत ऐका, 'फिट' रहा..'; मनाचे नैराश्य दूर करण्याचा प्रभावी उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 17:55 IST

world music therapy day प्रत्येक व्यक्ती ही जन्मत:च संगीताशी जोडलेली असते. त्यामुळे आपल्या आवडीचे शांत संगीत किंवा एखादे चित्रपटगीत ऐकल्यानेही मनावरचा ताण काही काळासाठी दूर होतो

ठळक मुद्देप्रत्येक व्यक्ती ही जन्मत:च संगीताशी जोडलेली असते.

औरंगाबाद : कोरोनाने आरोग्यासह अनेक समस्यांना जन्म दिला आहे. बिघडलेल्या आर्थिक घडीसोबतच अनेकांचे कौटुंबिक नातेसंबंधही कलुषित झाले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या मानसिक त्रासांना अनेकांना सामोरे जावे लागत आहे. मनाची ही उलथापालथ थांबविण्यासाठी आणि विचारांना स्थिरता देण्यासाठी दररोज काहीकाळ तुमच्या आवडीचे संगीत ऐका आणि मानसिकदृष्ट्या 'फिट' रहा, असा सल्ला संगीतोपचार तज्ज्ञ देत आहेत. 

संगीतोपचार म्हणजे नुसते गाणे ऐकणे, असा अनेकांचा समज आहे. पण संगीतोपचार म्हणजे केवळ गाणे ऐकणे नव्हे. संगीतात जेव्हा वेगवेगळे प्रयोेग करून रुग्णांवर उपचार केले जातात, तेव्हा त्याला संगीतोपचार म्हणतात. प्रत्येक व्यक्ती ही जन्मत:च संगीताशी जोडलेली असते. त्यामुळे आपल्या आवडीचे शांत संगीत किंवा एखादे चित्रपटगीत ऐकल्यानेही मनावरचा ताण काही काळासाठी दूर होत असल्याचा किंवा आवडीचे संगीत कानावर पडताच शरीर आणि मन लगेचच पकड घेत असल्याचा अनुभव प्रत्येकानेच घेतलेला असतो. यातूनच संगीतोपचाराचे महत्त्व दिसून येते, असे संगीतोपचारतज्ज्ञ सांगतात.

कोरोना काळात उपयोगी जिल्हा सामान्य रुग्णालयातही कोरोना वॉर्डमध्ये काहीकाळ रुग्णांसाठी शांत संगीत लावून ठेवले जात होते. काही काळ आजार विसरून रुग्णांना एकटेपणा जाणवू नये, असा उद्देशही त्यामागे होता.

मन हलके करण्याचे सामर्थ्य संगीतातले वेगवेगळे प्रयोग पर्किंसन, अल्झायमर, विस्मरण या आजारांमध्ये प्रभावी उपाय ठरू शकतात. लॉकडाऊनकाळात विशेष मुलांना नियंत्रणात ठेवणे, त्यांच्या पालकांसाठी आव्हान होते. अशा मुलांना शांत करण्याचे, त्यांना त्यांचा आनंद मिळवून देण्याचे काम म्युझिक थेरपीने केले. विशेष मुले, वृद्ध व्यक्ती, मानसिकदृष्ट्या आजारी अशा सगळ्यांनाच संगीतोपचार उपयोगी ठरतो. मन हलके करण्याचे सामर्थ्य संगीताएवढे इतर कोणत्याही कलेत नाही.- मंजूषा राऊत, म्युझिक थेरपिस्ट

संगीतोपचार केल्याने रुग्णाला नक्कीच फायदाकोविड रुग्णांनाही संगीतोपचार देणे, ही सध्याच्या काळातली अतिशय उत्तम कल्पना ठरू शकते. मानसिक आजारांना नियंत्रणात ठेवण्याचे काम संगीत करते, हे अनेक अभ्यासातूनही सिद्ध झाले आहे. आजार कमी स्वरूपाचा असल्यास केवळ संगीतोपचाराने आणि आजाराची तीव्रता जास्त असल्यास औषधांसोबतच संगीतोपचार केल्याने रुग्णाला नक्कीच फायदा होतो.- डॉ. प्रसाद देशपांडे, मानसोपचारतज्ज्ञ, शासकीय वैद्यकीय रुग्णालय 

टॅग्स :musicसंगीतAurangabadऔरंगाबाद