शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

लिंगायत महामोर्चाची औरंगाबादेत जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 23:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देऊन राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी औरंगाबादेत ...

ठळक मुद्देगावागावांत बैठका : स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी ८ एप्रिलला विभागीय आयुक्तालयावर महामोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देऊन राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी औरंगाबादेत ८ एप्रिल रोजी सकाळी १० वा. क्रांतीचौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर मराठवाडा विभागीय लिंगायत धर्म महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चाची अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीकडून जय्यत तयारी सुरू असून, मराठवाड्यातील गावागावांमध्ये बैठका घेण्यात येत आहेत.कर्नाटक सरकारने दोन दिवसांपूर्वीच लिंगायत समाजास स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्याची मागणी मान्य केली. त्यामुळे महाराष्ट्रातही या मागणीने आता अधिक जोर धरायला सुरुवात केली आहे. राज्यात आतापर्यंत नांदेड, लातूर, सांगली, कोल्हापूर, यवतमाळ याठिकाणी मोर्चे काढण्यात आले आहेत.आता औरंगाबादेत ८ एप्रिल रोजी मराठवाडा विभागीय लिंगायत धर्म महामोर्चा काढण्यात येणार आहे. क्रांतीचौकातून सुरू होणाऱ्या महामोर्चात महिला पारंपरिक फेटे परिधान करून सर्वात पुढे राहतील. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरातील व्यासपीठावर धर्मगुरू उपस्थित राहतील.मराठवाड्यातील कानाकोपºयातून समाजबांधव येणार असल्याने शहरातील विविध मंगल कार्यालयांमध्ये त्यांच्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.झेंडे, पत्रके, पोस्टर्स झळकणारमहामोर्चाच्या तयारीसाठी ४ फेब्रुवारी रोजी पहिली बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर लिंगायत धर्म महामोर्चा विभागीय प्रचार कार्यालयाचे उद््घाटन क रण्यात आले.गेल्या महिनाभरात बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड येथील गावागावांमध्ये ३५० वर बैठका घेण्यात आल्या. यापुढे लातूर, उस्मानाबादमध्ये बैठका घेण्यात येणार आहेत.लिंगायत मेडिकल असोसिएशनतर्फे झेंडे, लिंगायत बुक डेपो असोसिएशनतर्फे पत्रके, पोस्टर्स, स्टीकर्स, वकिलांतर्फे स्टेज, ध्वनिव्यवस्थेसाठी पुढाकार घेण्यात आल्याचे लिंगायत समन्वय समितीचे जिल्हा समन्वयक प्रदीप बुरांडे यांनी सांगितले.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयHinduहिंदू