लोकमत न्यूज नेटवर्ककुंडलवाडी : येथील कुंडलेश्वर मंदिरात राजेश्वरराव इनामदार प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ स्वा.सै. श्यामराव गुरुजी जहागीरदार, गोपलासिंह चौव्हाण यांना जीवनगौरव पुरस्कार विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.अध्यक्षस्थानी मुदखेडचे माजी नगराध्यक्ष रामराव चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. गंगाराम ठक्करवाड, संघटक गंगाधर जोशी, पालिका उपाध्यक्ष डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार, बालाजी बच्चेवार, बाजार समिती सभापती बाबाराव भाले, उपसभापती व्यंकटराव गुजरीकर, पंढरीनाथ दाचावार, आनंद बिरादार यांची उपस्थिती होती.प्रारंभी प्रतिष्ठाणच्या वतीने प्रा. आनंद इनामदार यांनी बागडे यांचा सत्कार केला. भाग्यलक्ष्मी बँकेच्या अध्यक्षा शैलजा इनामदार यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. यावेळी कुडमुलवार यांनी पालिकेत सीओ, प्रा.आर. केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याचे सांगून पालिकेचा विकास आराखडा मांडला. यावेळी ठक्करवाड, राम चौधरी, पंढरीनाथ दाचावार यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार, उमाकांत गोपछडे, राजीव अंबेकर, उपेंद्र कुलकर्णी, मनोहरराव देशपांडे, गंगाधर खेळगे, गंगाधरराव सब्बनवार, किशोर दाचावार, नरसिंह चौहाण, संग्राम हायगले, मारोती पाटील, दत्ता पा. हांडे, वारकड गुरुजी, आबाराव संगनोड, श्रावण भिलवंडे, रमेश दाचावार, बाबू खेडे, शांतेश्वर पाटील, श्रीनिवास जिठ्ठावार, लक्ष्मीबाई दाचावार, अरुणा बोडेवार, वंदना लापशेटवार, नगरसेवक अशोक खुळगे, शंकर गोणेलवार, पंडीतराव गवते, अशोक दाचावार, लक्ष्मीबाई दाचावार, कुसुम कवठाणे होते. सूत्रसंचालन डॉ. दीपक कासराळीकर यांनी केले.
जीवनगौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रम कुंडलवाडीत रंगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:18 IST