दंडाची रक्कम वारसांना नुकसानभरपाई
खुनाची घटना ३ ऑक्टोबर २०१६ रोजी घडली होती. न्यायालयाने आरोपीला आजन्म कारावास आणि २० हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम मृताची पत्नी आणि वारसांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. पैरवी अधिकारी म्हणून दीक्षित यांनी काम पाहिले.