शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

चला लगीनघाई करा, आजपासून चार दिवसांत उडवा तुळशी विवाहाचा बार

By प्रशांत तेलवाडकर | Updated: November 24, 2023 19:40 IST

तुळशी विवाहासाठी चार दिवस मुहूर्त असून त्यानंतर लग्नसराईचा धूमधडाका सुरू होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : लग्नासाठी बाशिंग बांधून बसलेल्या वधू-वरांना कधी एकदा तुळशीचा विवाह लागतो आणि आमचा लग्नाचा दिवस कधी उजाडतो, अशी लगीनघाई झाली आहे. तुळशी विवाहासाठी चार दिवस मुहूर्त असून त्यानंतर लग्नसराईचा धूमधडाका सुरू होणार आहे.

दरवर्षी परंपरेप्रमाणे यंदा लग्नसराईला २८ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी तुळशीचा विवाह लावण्यात येतो. ज्यांच्या अंगणात, बाल्कनीत, गच्चीवर तुळशीवृंदावन आहे, त्या त्या घरात तुळशीचा विवाह लावला जातो. तुळशी विवाह द्वादशी ते पौर्णिमेपर्यंत म्हणजे २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान लावता येणार आहे. या चार दिवसांपैकी एका दिवशी आपल्या सोयीनुसार सायंकाळी तुळशीचा विवाह लावण्यात यावा, असे पंचांगकर्त्यांनी नमूद केले आहे.

कार्तिक स्वामींचे दर्शन दोन दिवसकार्तिक स्वामींचे दर्शन हे कृतिका नक्षत्रावर घेतले जाते. कृतिका नक्षत्र रविवारी २६ नोव्हेंबरला दुपारी २ वाजेनंतर लागणार आहे. त्यादिवशी त्रिपुरारी पौर्णिमा तर सोमवारी कार्तिकी पौर्णिमा आहे. २७ ला दुपारी १.३५ वाजेपर्यंत पौर्णिमा आहे. यामुळे यंदा भगवान कार्तिक स्वामींचे दर्शन सलग दोन दिवस घेण्याची भाविकांसाठी पर्वणीच आहे.- प्रवीण कुलकर्णी गुरुजी

तुळशी वृंदावन, गेरूचा रंग, ऊस, पूजेचे साहित्यतुळशीच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. यासाठी तुळशी वृंदावनाची खरेदी केली जात आहे. अनेक जण आपल्या अंगणातील तुळशी वृंदावनाला गेरूचा रंग लावत आहेत. बाजारात ऊसही आला आहे. तसेच पूजेचे अन्य साहित्यही खरेदी केले जात आहे. विशेषत: महिला यासाठी पुढाकार घेत आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक