नांदेड : सामाजिक बांधिलकीतून युवक काँग्रेस सातत्याने रक्तदान शिबीरे घेत आहे, ही बाब कौतुकास्पद असून युवकांना प्रोत्साहन देणे आमचे कर्तव्य आहे़ युवक संवाद कार्यक्रमात दिलेली आश्वासने लवकरच पूर्ण करू, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी केले़ नांंदेड लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने डॉ़ शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी नवा मोंढा येथे आयोजित रक्तदान शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ दरम्यान, दिवसभर चाललेल्या शिबीरात ७२९ जणांनी रक्तदान केले़ पालकमंत्री डी़ पी़ सावंत, आ़ अमरनाथ राजूरकर, आ़ओमप्रकाश पोकर्णा, आ़वसंतराव चव्हाण, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बी़ आऱ कदम, जि़प़ अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, सभापती उमेश पवळे, केदार पाटील - साळुंके, नांदेड कृउबाचे संचालक बाबुराव कोंढेकर, आनंदराव गरड, मंगलाताई निमकर, नगरसेवक विजय येवनकर, नवल पोकर्णा, संजय लहानकर आदींची प्रमुख उपस्थिती होती़ जिल्ह्यातील युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी युवक काँग्रेसची टीम खंबीर आहे़ यापूर्वी झालेल्या युवक संवाद कार्यक्रमात युवकांनी चांगले प्रश्न मांडले़ या प्रश्नांचा एक अजेंडा तयार करा़ ते प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच आढावा बैठक घेतली जाईल, असे मत माजी मुख्यमंत्री खा़ चव्हाण यांनी व्यक्त केले़ जिल्ह्यातील युवक काँग्रेसच्या कार्याचा आढावा घेतांना त्यांनी पप्पू पाटील कोंढेकर यांच्या कार्याचेही कौतुक केले़ पालकमंत्री सावंत म्हणाले, काँग्रेसचे २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण असते म्हणूनच सामाजिक बांधिलकीपोटी युवक काँग्रेस सातत्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करते़ आ़ राजूरकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे पेडन्यूज प्रकरणात निर्दोष आहेत़ प्रास्ताविकात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तिरूपती पाटील कोेंढेकर यांनी रक्ताची वाढती मागणी आणि गरज लक्षात घेवून आजच्या युवकांनी रक्तदानासारख्या सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले़ सूत्रसंचालन बालाजी सूर्यवंशी तर महेश देशमुख यांनी आभार मानले़ यशस्वीतेसाठी नांदेड लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तिरूपती - पप्पु पाटील कोंढेकर, उपाध्यक्ष पिंकु पोकर्णा, सरचिटणीस महेश देशमुख तरोडेकर, रूपेश यादव, मारोती किरकन, साई गोंढ, उत्तर विधानसभा अध्यक्ष विठ्ठल पावडे, अब्दुल गफार, माधव कदम, रवी खतगावकर, सरपंच नागोराव खानसोळे, दत्तू देशमुख, गोटी पाटील, महेश मगर, अतुल पेदेवाड, जयसिका शिंदे, महानंदा शेळके, उमेश कोटलवार, सूरज पाटील, जगन्नाथ शिंदे यांच्यासह कै़ शंकरराव चव्हाण शासकीय रक्तपेढी, अर्पण रक्तपेढी, गोळवळकर गुरूजी रक्तपेढी, श्री हुजूर साहिब रक्तपेढी, नांदेड ब्लड बँक, गुरू गोबिंदसिंघजी रक्तपेढी आणि पारसी अंजुमन रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)
युवकांचे व्हीजन लवकरच पूर्ण करू
By admin | Updated: July 15, 2014 00:56 IST