शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कलावंत निवड यादी आठ दिवसांत पूर्ण करू

By admin | Updated: December 30, 2014 01:19 IST

औरंगाबाद : समाजकल्याण विभागाच्या मागील चार वर्षांपासून रखडलेल्या वयोवृद्ध साहित्यिक, कलावंत मानधन योजनेतील कलावंतांची निवड यादीची

औरंगाबाद : समाजकल्याण विभागाच्या मागील चार वर्षांपासून रखडलेल्या वयोवृद्ध साहित्यिक, कलावंत मानधन योजनेतील कलावंतांची निवड यादीची फेरचौकशी करून येत्या आठ-दहा दिवसांत ही यादी राज्य सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी कलावंतांना शुक्रवारी दिले. अशासकीय सदस्यांच्या जिल्हा निवड समितीने कलावंतांची निवड करून यादी समाजकल्याण विभागाला दिली आहे; परंतु शाहीर साबळे व इतरांनी या निवड यादीसंदर्भात गंभीर आक्षेप घेतल्याने सर्व प्रक्रिया ठप्प झाली आहे. स्थायी समितीची शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष शेषराव गाडेकर, श्यामराव साळुंखे, लखूसिंग नाईक, उषा विसपुते व निवड यादीतील कलावंतांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन यांची भेट घेतली. यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, यादीसंदर्भात घेण्यात आलेल्या आक्षेपांची चौकशी येत्या आठ-दहा दिवसांत पूर्ण करू. अर्थ व बांधकाम सभापती संतोष जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.के. लांगोरे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी समाधान इंगळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. समिती सदस्य श्यामराव साळुंखे यांनी यावेळी समितीच्या अडचणी सांगितल्या. ते म्हणाले की, या योजनेसाठी औरंगाबाद जिल्ह्यातून दरवर्षी ६० कलावंत, साहित्यिकांची निवड केली जाते. त्यानुसार सन २०१० ते १२ या तीन वर्षांसाठी १८० पात्र कलावंतांची निवड करणे अपेक्षित होते. त्यासाठी जिल्हाभरातून १,८५० कलावंतांनी प्रस्ताव सादर केले. अशासकीय समितीने कोट्यानुसार १८० पात्र कलावंतांची निवड करून यादी समाजकल्याण विभागाला सुपूर्द केली. त्यातील ६३ कलावंतांची निवड करण्यात आली. उर्वरित ११७ कलावंतांच्या नावांना अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. सन २०१३ या वर्षामधील ६० कलावंतांची यादीही समितीने प्रस्तावित केली आहे. ४जिल्हास्तरावरील वयोवृद्ध कलावंतांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची ही मानधन योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविली जाते. त्यात कलावंतांच्या दर्जानुसार अ, ब, क हे तीन गट आहेत. या श्रेणीनुसार अनुक्रमे १,४००, १,२०० व १,००० रुपये मानधन ते हयात असेपर्यंत मिळते. त्यांच्या निधनानंतर वारस पती, पत्नीला मानधन मिळते. सध्या जिल्ह्यात ६६३ कलावंतांना हे मानधन मिळते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच समाजकल्याण विभागाने १५ दिवसांपूर्वीच बैठक आयोजित केली होती.