शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
4
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
5
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
6
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
7
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
8
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
9
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
10
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
11
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
12
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
13
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
14
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
15
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
16
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
17
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
18
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
19
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
20
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...

आता तरी आम्हाला शस्त्रक्रिया शिकू द्या; निवासी डाॅक्टरांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 13:05 IST

Ghati Govt medical college Aurangabad News : औषधवैद्यकशास्त्र, वार्धक्यशास्त्र, बधिरीकरणशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागासोबत इतर सर्जरी ब्रँचेस समजल्या जाणाऱ्या शल्यचिकित्सा, कान, नाक, घसा, नेत्ररोग, अस्थिव्यंगोपचार विभागाचेही निवासी डाॅक्टर कोरोना रुग्णसेवेत

ठळक मुद्देसर्जरी, ईएनटी, नेत्ररोग, अस्थिव्यंगोपचार विभागाच्या निवासी डाॅक्टरांची मागणी

- योगेश पायघनऔरंगाबाद : गेल्या दीड वर्षापासून शैक्षणिक अभ्यासक्रम सोडून कोरोना रुग्णसेवा देत आहोत. आता रुग्णसंख्या ओसरली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढतील तेव्हा सेवा देऊ; मात्र आता तरी शस्त्रक्रिया (सर्जरी) शिकू द्या, अशी मागणी सर्जिकल शाखा मानल्या जाणाऱ्या शल्यचिकित्सा, कान, नाक घसा, नेत्ररोग, अस्थिव्यंगोपचार विभागाच्या घाटीतील निवासी डाॅक्टरांनी केली आहे. ( Let us learn surgery now though; Demand for resident doctors) 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विभागीय टर्शरी केअर सेंटर आहे. गेल्या दीड वर्षात १० हजार ४२४ गंभीर कोरोनाबाधितांवर घाटीत उपचार केले गेले. आठशेहून अधिक खाटांवर कोरोना रुग्णांना रुग्णसेवा दिल्या जात असल्याने औषधवैद्यकशास्त्र, वार्धक्यशास्त्र, बधिरीकरणशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागासोबत इतर सर्जरी ब्रँचेस समजल्या जाणाऱ्या शल्यचिकित्सा, कान, नाक, घसा, नेत्ररोग, अस्थिव्यंगोपचार विभागाचेही निवासी डाॅक्टर कोरोना रुग्णसेवेत गुंतले. यात एमडी, एमएस या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशित डाॅक्टरांचे शैक्षणिक नुकसान झाले. कोरोनाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र हाऊस ऑफिसर भरल्यास रुग्णसेवेचा ताण विद्यार्थी डाॅक्टरांवर येणार नाही; मात्र त्यांना वेळेवर पगार न दिल्याने ते डाॅक्टर सेवा सोडून जातात. त्यामुळे निवासी डाॅक्टरांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे मत घाटीतील निवासी डाॅक्टरांनी व्यक्त केले.

सर्जिकल ब्रँचेसच्या विद्यार्थ्यांची धडपडगेल्या दीड वर्षात मूळ अभ्यासक्रमाऐवजी कनिष्ठ निवासी १ (जेआर१), कनिष्ठ निवासी २ (जेआर२), कनिष्ठ निवासी ३ (जेआर३) डाॅक्टरांनी कोरोनात सेवा दिली. आता जेआर ३ झालेल्या डाॅक्टरांना शेवटच्या वर्षात तरी सर्जरी शिकायला मिळावी यासाठी सर्जिकल ब्रँचेसच्या विद्यार्थ्यांची धडपड सुरु आहे.- डाॅ. आबासाहेब तिडके, एमएस सर्जरी विभागाचे विद्यार्थी

विद्यार्थ्यांना परत पाठवण्याचे नियोजनरुग्ण कमी झाल्याने केवळ ४७ बाधित रुग्ण भरती आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी एकच वॉर्ड सुरु आहे. त्यामुळे सर्जिकलच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गृह विभागात काम करण्यासाठी, शिक्षणासाठी परत पाठवण्याचे नियोजन केले आहे. आता ते विद्यार्थी मूळ अभ्यासक्रम शिकू शकतील.- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी), औरंगाबाद

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीdoctorडॉक्टर