शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

विद्यापीठातील २८ विभागांत दोन आकड्यांपेक्षा कमी प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:16 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थी संख्येचे विदारक वास्तव समोर आले आहे. विद्यापीठ आणि उपकेंद्रातील तब्बल २८ विभागांमध्ये १० पेक्षा कमी प्रवेश झाले आहेत.

ठळक मुद्देपदव्युत्तरची दुरवस्था : चार विभागांत शून्य तर आठ विभागांत १५ पेक्षाही कमी विद्यार्थ्यांचे प्रवेश; व्यावसायिक अभ्यासक्रमही अडचणीत

राम शिनगारे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थी संख्येचे विदारक वास्तव समोर आले आहे. विद्यापीठ आणि उपकेंद्रातील तब्बल २८ विभागांमध्ये १० पेक्षा कमी प्रवेश झाले आहेत. यातील चार विभागांत, तर एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही. आठ विभागांत १५ पेक्षा कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. एकाही विभागात १०० टक्के प्रवेश पूर्ण झालेला नाही.विद्यापीठात मागील वर्षीपासून सामाईक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) माध्यमातून प्रवेश देण्यात येतो. मागील वर्षी प्रवेश प्रक्रियेचे तीनतेरा वाजल्यामुळे यावर्षी परीक्षेच्या नियोजनात अचूकपणा आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या अल्प प्रतिसादामुळे अनेक वेळा नोंदणी, प्रवेश फेऱ्यांना मुदतवाढ द्यावी लागली. तिसºया प्रवेश फेरीनंतर ३ हजार ९९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर ५ हजार ८३७ जागा रिक्त राहिल्या. त्यातही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाऐवजी महाविद्यालयांना प्राधान्य दिले आहे. विद्यापीठ आणि उपकेंद्रातील एकूण ५२ पदव्युत्तर अभ्यासक्रमांतील तब्बल २८ विभागांमध्ये दहापेक्षा कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. याचवेळी यातील चार विभागांत भोपळा आणि इतर चार विभागांत केवळ १ प्रवेश झाला. आठ विभागांत १५ पेक्षा कमी प्रवेश झाले आहेत.मराठीसह भाषा विषयाकडे विद्यार्थ्यांची पाठविद्यापीठातील विविध भाषा विषयाच्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. यात रशियन भाषा व साहित्याला ००, तर मराठी विभागात अवघ्या ५ (७०) (कंसातील आकडेवारी ही एकूण जागांची आहे) विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. हिंदीमध्ये ७ (७०), पाली आणि बुद्धिझम ७ (७०), संस्कृत १ (७०) आणि उर्दू ५ (७०) विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. याचवेळी विद्यापीठातील इंग्रजी भाषेत ३५ (७०) आणि उपकेंद्रातील इंग्रजी विभागात अवघा १ (७०) प्रवेश झाला आहे.या विभागांना मिळाला चांगला प्रतिसादविद्यापीठातील वाणिज्य ५४ (७०), रसायशास्त्र ६९ (७०), अर्थशास्त्र ४५ (७०), राज्यशास्त्र ३१ (७०), विधि ३८ (७०), पत्रकारिता २५ (४०), बायोकेमिस्ट्री १६ (२२), वनस्पतीशास्त्र ४२ (४८), संगणशास्त्र २८ (३२), गणित ६६ (७०), भौतिकशास्त्र ४६ (४८), संख्याशास्त्र २४ (३२), प्राणिशास्त्र ५६ (७०), अ‍ॅनॅलिटल केमिस्ट्री २० (२४), सोशल वर्कमध्ये २६ (४०).पारंपरिक, व्यावसायिकअभ्यासक्रमांना अल्प प्रतिसादविद्यापीठात शिकविल्या जाणाºया पारंपरिक, व्यावसायिक अभ्यासक्रमांनाही अल्प प्रतिसाद मिळाला आहे. यात पार्ट टाईम एमबीए ६ (६०), पर्यटनशास्त्र ६ (३०), भूगोल १५ (७०), इतिहास १४ (७०), मानसशास्त्र १४ (७०), लोकप्रशासन ६ (७०), समाजशास्त्र १३ (७०), स्त्री अभ्यास ७ (७०), योगा ७ (७०), पुरातत्वशास्त्र १ (२९), संगीत ९ (७०), महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर विचारधारा १ (७०), ग्रंथालयशास्त्र ३ (२२), परफॉर्मिंग आर्ट ५ (३०), फाईन आर्ट ५ (२५), माहिती तंत्रज्ञान १४ (३२), पर्यावरणशास्त्र ७ (३२), नॅनोटेक्नॉलॉजी ४ (२०), इलेक्ट्रॉनिक्स सायन्स ६ (४०), आॅटोमोबाईल एमव्होक ३ (५०), इंडस्ट्रियल आॅटोमेशन ४ (५०), तर फाईन आर्ट रिसर्च ११ (२५) विद्यार्थ्यांचा समावेश आहे. उस्मानाबाद उपकेंद्रातील जल आणि भूमिव्यवस्थापन विभागात ३ (४०), बायोटेक्नॉलॉजी १५ (२६) आणि मायक्रोबायलॉजी १४ (२६).

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद