शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई परिसरात आढळला बिबट्या

By admin | Updated: April 29, 2017 23:21 IST

अंबाजोगाई : तालुक्यातील येल्डा परिसरातील दाट जंगलामध्ये शनिवारी दुपारी बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली

अंबाजोगाई : तालुक्यातील येल्डा परिसरातील दाट जंगलामध्ये शनिवारी दुपारी बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याला पकडण्यात वनविभागाला अपयश आले. मात्र, वनविभागाचे अधिकारी व काही ग्रामस्थांच्या नजेरस तो पडला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरापासून सहा किमी अंतरावर २०० एकरवर दाट झाडी आहे. दुपारी अडीच वाजता शेतकाम करणाऱ्या सर्जेराव शेंडगे, व्यंकटेश चामनर, अशोक खोडवे, तुकाराम शेंडगे, कालिदास खोडवे यांनी त्यास पहिल्यांदा पाहिले. त्यांना तो वाघासारखा दिसला. ही खबर संपूर्ण शहर व तालुक्यात पसरली. त्यानंतर येल्डा परिसरात बघ्याची गर्दी झाली. रणरणत्या उन्हात नागरिक त्याला पाहण्यासाठी जमा झाले होते.दरम्यान, अंबाजोगाई येथील वन परिमंडळ अधिकारी शंकर वरवडे यांनी वन कर्मचारी जी. बी. कस्तुरे, ज्ञानोबा हेडे यांच्यासमवेत धाव घेतली. यावेळी बिबट्या त्यांच्या नजरेस पडला. मात्र, क्षणार्धात तो दाट झाडीत पळून गेला. वन परिमंडळ अधिकारी वरवडे म्हणाले, बिबट्या वनसंपदा व तृणभक्षी प्राणी असलेल्या क्षेत्रात आढळून येतो. येल्डा परिसरात त्याच्यासाठी अनुकूल वातावरण आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. बिबट्याचा पाठलाग करू नका व त्यास छेडू नका, असे आवाहन त्यांनी केले. पिकांची नासधूस करणाऱ्या रानडुकरांना आळा बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्यास नुकसान भरपाई देऊ, असे ते म्हणाले. (वार्ताहर)