शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या पडला विहिरीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 20:52 IST

सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो विहिरीत पडल्याची घटना आज दुपारी घडली.

ठळक मुद्दे सोयगाव शिवारातील सर्वच पाणवठे महिनाभरापासून कोरडेठाक झाल्याने वन्यप्राण्यांच्या घशाला कोरड पडली आहे.

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो विहिरीत पडल्याची घटना आज दुपारी घडली. वन विभागाच्या पथकाने शिताफीने त्याला विहिरीबाहेर काढताच जखमी बिबट्याने वनक्षेत्रात धूम ठोकली.

अजिंठ्याच्या डोंगरपायथ्याशी वसलेल्या सोयगाव शिवारातील सर्वच पाणवठे महिनाभरापासून कोरडेठाक झाल्याने वन्यप्राण्यांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांनी गाव शिवाराकडे धाव घेतली आहे. जरंडीच्या काटीखोरा शिवारातून पिण्याच्या पाण्यासाठी भ्रमंती करत आलेल्या बिबट्याला शेतकरी ज्ञानेश्वर तोताराम मोरे यांच्या शेतातील पाण्याने डबडबलेली विहिर दिसताच त्याने धाव घेतली. तोल गेल्याने बिबट्या विहिरीत पडला. यानंतर डरकाळ्या ऐकून शेतकरी ज्ञानेश्वर मोरे  यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना बिबट्या दिसला.  त्यांनी परिसरातील शेतक-यांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी वनविभागाचे पथकास पाचारण करण्यात आले. ग्रामस्थांच्या मदतीने तीन तास संघर्ष करून बिबट्याला विहिरीबाहेर काढताच त्याने जखमी अवस्थेतच जंगलाकडे धूम ठोकली.

या कामी माजी उपसरपंच एकनाथ चौधरी, ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटील, भिवा चव्हाण, पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, शेतकरी ज्ञानेश्वर मोरे, शांताराम पाटील, भगवान काकडे, ईश्वर मोरे, बाळूतात्या, वनपाल रावसाहेब दारुंटे, वनरक्षक माया जिने, गोविंदा गांगुर्डे, गणेश चौधरी आदींनी परिश्रम घेतले. वन कर्मचा-यांनी जीव धोक्यात घालून बिबट्याला बाहेर काढले. चारपायीवरून बाहेर येताच बिबट्याने भिवा चव्हाण, वनमजूर गणेश चौधरी यांच्यावर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला, परंतु या दोघांनी प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला.

टॅग्स :leopardबिबट्याagricultureशेतीFarmerशेतकरी