शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या रहिवासी भागात बिबट्याचा थरार; एकावर हल्ला तर दोन कुत्र्यांचा पाडला फडशा

By साहेबराव हिवराळे | Updated: September 11, 2022 19:58 IST

बिबट्या नेमका कोठून आला, हे जाणून घेण्यासाठी त्याच्या पायाचे ठसे घेण्याचा प्रयत्न वन विभागाच्या पथकाने केला. पण, पावसामुळे ठसे मिळण्यास अडचणी येत आहेत.

औरंगाबाद: राजनगर मुकुंदवाडी परिसरात स्थानकालगत बिबट्याने शुक्रवारी रात्री दोन वाजता एका घरात झोपलेल्या व्यक्तीवर हल्ला केला. प्रतिकार केल्याने बिबट्या पळाला. जखमी व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत घाटीत पोहोचली. बिबट्याने धावून आलेल्या दोन कुत्र्यांचीही हत्या केली. या प्रकारामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.

मुकुंदवाडी रेल्वे स्थानकालगत राजनगरात शुक्रवारी पहाटे दोन वाजता संजय शेजवळ यांच्या घरामध्ये बिबट्याने घुसून हल्ला केला. उजव्या पायाचा पंजा पकडून बिबट्या ओढत असताना त्यांनी आरडाओरड केली. त्यांनी जोरदार प्रतिकार केल्याने बिबट्या तेथून निघून गेला. संजय शेजवळ यांनी जखमी अवस्थेत घाटी रुग्णालय गाठले. त्यांच्या पायात चार दात खोलवर घुसले असून, गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत.

बिबट्या शनिवारी पुन्हा याच भागात आला. त्यावर धावून गेलेल्या दोन कुत्र्यांना त्याने मारून टाकले. एक कुत्रे तेथेच मरून पडले, तर बिबट्याने दुसऱ्या कुत्र्याला आंधारात फरफटत नेले. या गोंधळामुळे परिसरातील तरुणांनी बिबट्याचा पाठलाग केला; परंतु तो सापडला नाही. अंधारात बिबट्या जंगलात गेला असावा किंवा अथवा पडक्या घरात दडून बसला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

पायाचे ठसे घेण्याचा प्रयत्नबिबट्या नेमका कोठून आला, हे जाणून घेण्यासाठी त्याच्या पायाचे ठसे घेण्याचा प्रयत्न वन विभागाच्या पथकाने केला. या भागात पावसामुळे चिखल झालेला आहे. त्यामुळे तेथे अन्य जनावरांचेही ठसे असल्याने बिबट्याच्या पायाचे ठसे मिळू शकले नाहीत. बिबट्याने दोन दिवसांत एक व्यक्ती आणि दोन कुत्र्यावर हल्ला केल्यामुळे वन विभागाच्या पथकाने मानवी वसाहतीमध्ये पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मोहन साळवे, शैलेश भालेराव यांनी केली आहे.

नागरी वसाहतीमध्ये दहशतलोहमार्गालगत असलेले राजनगर ही गजबजलेली वसाहत आहे. तेथे बिबट्याने थेट घरात शिरून व्यक्तीवर हल्ला केल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. संजय शेजवळ यांनी जोरदार प्रतिकार केल्याने त्यांची कशीबशी सुटका झाली. पत्र्याच्या घरामध्ये रक्ताचा सडा पडला होता. बिबट्या पळून गेल्याचे चित्रीकरण परिसरातील ‘सीसीटीव्ही’मध्ये झाले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी दादाराव तौर यांनी अप्पासाहेब तागड यांचे पथक वन विभागाने पाठवले आहे.

टॅग्स :leopardबिबट्याAurangabadऔरंगाबाद