शहरं
Join us  
Trending Stories
1
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
2
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
3
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
4
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
5
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
6
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
7
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
8
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
9
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
10
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
11
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
12
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
13
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
14
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
15
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
16
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
17
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
18
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
19
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
20
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

आमदारांनी सुचविली साडेबारा कोटींची कामे

By admin | Updated: July 24, 2014 00:27 IST

नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय मंडळी कामाला लागली असून प्रशासकीय यंत्रणाही सज्ज होत आहे़

नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय मंडळी कामाला लागली असून प्रशासकीय यंत्रणाही सज्ज होत आहे़ त्याचवेळी विद्यमान आमदार आपल्या स्थानिक विकास निधीतून कामे पूर्ण करण्यात गुंतली आहेत़ यातून निवडणुकीच्या तोंडावर अनेक ठिकाणी उद्घाटन सोहळे पार पडत आहेत़ चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ९ आमदारांनी १२ कोटी ४१ लाख २५ हजारांच्या कामांचे प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविले आहेत़ आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी दरवर्षी २ कोटी रूपयांचा निधी दिला जातो़ जिल्ह्यात ९ आमदारांसह एका विधान परिषद सदस्यासाठी २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी २० कोटी रूपये प्राप्त झाले आहेत़ त्यातून ६ कोटी १४ लाख २६ हजार रूपये सन २०१३-१४ मधील अपूर्ण कामासाठी आवश्यक आहेत़ उर्वरित निधीतून जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आपल्या मतदारसंघात कामे सूचविली आहेत़त्यात नांदेड उत्तर मतदारसंघासाठी पालकमंत्री डी़पी़ सावंत यांनी १ कोटी २९ लाख ६८ हजारांची कामे सूचवले आहेत़ तर आ़ ओमप्रकाश पोकर्णा यांनी नांदेड दक्षिण मतदारसंघासाठी १ कोटी ८४ लाख ४९ हजार, लोहा मतदारसंघासाठी आ़ शंकरअण्णा धोंडगे यांनी १ कोटी ३८ लाख ९ हजार, मुखेड मतदारसंघासाठी आ़ हणमंत पाटील बेटमोगरेकर यांनी १ कोटी ३१ लाख ६५ हजार, देगलूर मतदारसंघासाठी आ़ रावसाहेब अंतापूरकर यांनी १ कोटी ३३ लाख ७ हजार, नायगाव मतदारसंघासाठी आ़ वसंतराव चव्हाण यांनी १ कोटी ५० लाख ८७, हदगाव मतदारसंघासाठी आ़ माधवराव पाटील जवळगावकर यांनी १ कोटी ३० लाख ३१ हजार, किनवट मतदारसंघासाठी आ़ प्रदीप नाईक यांनी १ कोटी २४ लाख २३ हजार आणि विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर यांनी १ कोटी २४ लाख २३ हजार रूपयांची विकासकामे सूचविली आहे़ यासंदर्भात नियोजन अधिकारी डॉ़ किरण गिरगावकर यांनी सांगितले, आमदारांनी विकासकामे सूचविल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून तांत्रिक मान्यतेसह अंदाजपत्रक सादर केले जाते़ त्यानंतर या अंदाजपत्रकांना मंजुरी दिली जाते़ त्या-त्या वर्षाचा निधी खर्च करण्यासाठी त्याच वर्षात कामे सूचवून मंजुरी घ्यावी लागते़ सन २०१३-१४ साठी उपलब्ध असलेला २ कोटींचा निधी सर्व आमदारांनी उपयोगात आणला आहे़ तर चालू आर्थिक वर्षातही आमदारांनी जवळपा १ कोटी २५ लाखांपासून १ कोटी ७५ लाखांपर्यंत विकासकामे सूचविली आहेत़ (प्रतिनिधी)आमदारांना पुन्हा मिळाली दोन कोटींची संधी़़़! विधानसभेचा कार्यकाळ साधारणपणे आॅक्टोबर २०१४ अखेर समाप्त होत आहे़ ही बाब विचारात घेता विद्यमान विधानसभेच्या सदस्यांना २०१४-१५ या वर्षातील जवळपास ७ महिन्यांच्या कालावधीसाठी १ कोटी १६ लाख ६६ हजार रूपये नियोजन विभागाने मंजूर केले होते़ मात्र त्या निर्णयास १० जून २०१४ च्या पत्रानुसार नियोजन विभागाने स्थगिती देत विद्यमान विधानसभा सदस्यांना २ कोटींच्या मर्यादेत कामे सूचविण्यास मान्यता दिली आहे़