शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
3
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
4
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
7
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
8
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
9
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
10
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
11
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
12
Operation Sindoor Live Updates: हरियाणात मुसळधार पाऊस, पाहा व्हिडीओ
13
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
14
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
15
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
16
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
17
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
18
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
19
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
20
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video

जिल्ह्यात दिग्गज नेत्यांनी गड राखले

By admin | Updated: March 15, 2017 00:01 IST

जालना : पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीत दिग्गज नेत्यांनी आपले गड कायम राखले.

जालना : पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीत दिग्गज नेत्यांनी आपले गड कायम राखले. भोकरदन व जाफराबाद पं.स वर खा. रावसाहेब दानवे यांनी वर्चस्व कायम ठेवले. आ. राजेश टोपे यांनी अंबड व घनसावंगी येथे आपला दबदबा ठेवला. परतूर व मंठ्यात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी बहुमत सिद्ध करीत वर्चस्व ठेवले. बदनापूर समितीसह जालना समितीचे सभापती पद पटकावित राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे सिद्ध केले.शिवसेनेने वर्चस्व कायम ठेवण्यासाठी जालन्यात शिवसेना- काँग्रेस आघाडी होऊन शिवसेनेने सभापतीपद तर कॉंग्रसेने उपसभापतीपद मिळविले. एकूणच या नवीन राजकीय आघाडीची जिल्ह्यात सर्वदूर चर्चा रंगत आहे.जिल्ह्यातील आठ पंचायत समितीसाठी सभापती व उपसभापतींची निवड मंगळवारी झाली. चार पं.स.वर भाजपाने वर्चस्व मिळविले. दोन पंचायत समिती राष्ट्रवादीकडे तर बदनापूर पं.स.वर शिवसेनेने वर्चस्व राखले. जालन्यात शिवसेना व काँग्रेस अशी नवीन आघाडी झाली. जालना पंचायत समितीसाठी शिवसेना व काँग्रेस आघाडी होऊन सभापतीपदी शिवसेनेचे पांडुरंग डोंगरे तर उपसभापती काँग्रेसच्या द्वारकाबाई खरात यांची निवड झाली. जालना पंचायत समितीच्या १८ जागा आहेत. त्यात शिवसेना सात, भाजपा सात, काँग्रेस चार व अपक्ष एक असे पक्षीय बलाबल होते. अंबड पं.स.च्या दोन पदावर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व रखले. अंबड मध्ये एकूण१६ जागा असून राष्ट्रवादी दहा भाजपाने सहा जागांवर विजय मिळविला. सभापतीपदी सरला सीताराम लहाने तर उपसभापती किशोर नरवडे यांची बिनविरोध निवड झाली. घनसावंगी पंचायत समितीवर राष्ट्रवादीने दबदबा कायम ठेवत दोन्ही पदे ताब्यात घेतली. सभापती मंजुषा कोल्हे व उपसभापतीपदी आशामती उगले यांची निवड झाली. घनसावंगीत राकाँचे १०, सेनेचे ५ तर अपक्ष १ असे सदस्य संख्या होती. परतूरमध्ये भाजपाने दोन्ही जागांवर वर्चस्व राखले. यात सभापतीपदी शीतल तनपुरे तर उपसभापती म्हणून प्रदीप ढवळे यांची निवड झाली. मंठ्यात भाजपाने वर्चस्व प्रस्थापित करीत दोन्ही पदे मिळविली. सभापतीपदी स्मिता राजेश म्हस्के यांची सभपती तर उपसभापती कल्याण खरात यांची निवड झाली. जाफराबादच्या पं.स समितीसभापती भाजपाच्या साहेबराव कानडजे तर उपसभापती भाजपाच्याच वैशाली मुळे यांची निवड झाली. बदनापूर पं.समध्ये शिवसेनेकडे दोन्ही पदे आली. सभापतीपदी भरत मदन तर उपसभापती श्रीराम कानडे यांची निवड झाली. भोकरदनमध्ये भाजपाकडे दोन्हीपदे कायम राहीली. सभापतीपदी विलास आडगावकर तर उपसभापती गजानन नागवे यांची निवड झाली. जालना पंचायत समितीसाठी शिवसेना व काँग्रेस ही आघाडी नवीन राजकीय समीकरणाची नांदी ठरेल का, अशी चर्चा रंगत आहे. सेना व भाजपाचे पक्षीय बलाबल समान असताना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सत्ता कायम ठेवण्यासाठी वेगळी राजकीय रणनीती आखत काँग्रेसशी सोयरीक करून सभापतीपद पटकावले. ही आघाडी जि.प.अध्यक्षपदाच्या वेळीही नवीन जादू करणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे.