शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराला नेते आले नाहीत म्हणून झाली होती दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:13 IST

अ‍ॅड. काशीनाथ नावंदर.... हैदराबाद मुक्तिसंग्रामामध्ये सहभाग घेतल्यानंतर मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न समाजवादी मंडळी प्रभावीपणे मांडत होती. त्यासाठी विविध मार्गांचा अवलंब ...

अ‍ॅड. काशीनाथ नावंदर....हैदराबाद मुक्तिसंग्रामामध्ये सहभाग घेतल्यानंतर मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न समाजवादी मंडळी प्रभावीपणे मांडत होती. त्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जात होता. हा लढा संपताच संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला. यातही मराठवाडा संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने लढ्यात सहभागी झाला. मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर काही वर्षे हैदराबाद राज्यात समाविष्ट होता. तेव्हा विधानसभा हैदराबादेत होती. त्यावेळी प्रचारात गरिबी, शिक्षण, आरोग्य हेच जीवनावश्यक विषय होते.लोकांमध्ये स्वाभिमानी हैदराबाद लढ्याचा उत्साह होता. यातून मराठी भाषिक राज्याच्या मागणीनुसार मराठवाडा महाराष्ट्रात विनाअट समाविष्ट झाला. तेव्हा समाजवादी पक्षाच्या उमेदवारांसाठी हिरीरीने प्रचारात सहभागी होत. जात-धर्म-पंथाचा लवलेशही प्रचारात नसे. आमचे उमेदवार नेहमीच विकासाची भाषा करायचे. विरोधी काँग्रेसही कधीच वैयक्तिक, जातीय प्रचार करीत नसे. पुढे देशात आणीबाणी लागू झाली. तेव्हा समाजवादी, जनता दल आदी पक्षांनी प्रखर विरोध केला. देशभर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात वादळ निर्माण केले. आणीबाणीनंतर झालेल्या पहिल्याच लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. बापूसाहेब काळदाते यांना जनतेने निवडून दिले. देशात काँग्रेसविरोधी पक्षांची लाट होती. जनता दल पक्ष जोरात होता. १९७८ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता दलाचे औरंगाबाद (जालन्यासह) जिल्ह्यातून ७ आमदार निवडून आले होते. इंदिरा काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या दिग्गजांचा पराभव झाला. मात्र वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून शरद पवार मुख्यमंत्री बनले. ते सरकार इंदिरा गांधी यांनी १९८० साली पंतप्रधान होताच बरखास्त करून टाकले. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आय काँग्रेसची लाट निर्माण झाली होती. औरंगाबादेत काझी सलीम हे खासदार बनले. त्याच वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आय काँग्रेस आणि जनता दल यांच्यात लढत झाली. जनता दलाकडून मला तिकीट मिळाले होते. माझ्याविरोधात आय काँग्रेसने अब्दुल अजीम यांना तिकीट दिले. या निवडणुकीत जनता दल आणि जनसंघातील युतीची बोलणी फिसकटली. या निवडणुकीत माझा पराभव झाला. अब्दुल अजीम हे आमदार बनले. तेव्हा माझ्या प्रचारासाठी भारताचे उपपंतप्रधान राहिलेले जगजीवन राम येणार होते. आमखास मैदानावर जाहीर सभा आयोजित केली होती. लोक दुपारी दोन वाजेपासूनच त्यांना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी जमले होते. चार वाजले तरी ते आले नाहीत. सहा वाजेपर्यंत लोक थांबले. शेवटी लोकांच्या सहनशीलतेचा अंत झाला. त्यांनी औरंगपुऱ्यातील माझ्या प्रचार कार्यालयावर चाल करून येऊन दगडफेक केली. ही एक वादग्रस्त घटना घडली होती. याच निवडणुकीत राज बब्बर, मृणालताई गोरे यांनी माझ्यासाठी प्रचार सभा घेऊन निवडणुकीत रंगत आणली. मात्र जनसंघाने मदत न केल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला.निवडणुकीत हार-जीत होते. हे तेव्हा गृहीत धरलेले असायचे. पराभव झाला तरी फार काही परिणाम होत नसे. आमचे काम दुसऱ्या दिवसापासून सुरू होत असे. पुढे वकिलीतच अधिक लक्ष देऊन जम बसवला. बार असोसिएशनचा अध्यक्ष असताना औरंगाबादेत मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू व्हावे यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही भेट घेतली होती. वयाच्या ९२ व्या वर्षी त्या सगळ्या आठवणी जाग्या राहिल्या आहेत.शब्दांकन : राम शिनगारे

टॅग्स :AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक