शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांसाठी पहाड फोडणारा नेता हरपला़़़

By admin | Updated: January 24, 2017 22:36 IST

उदगीर जनसामान्यांच्या प्रश्नांना, प्रसंगी आक्रमक मार्ग स्वीकारुन तडीस लावणारा नेता... अशी चंद्रशेखर भोसले यांची ओळख होती़

व्ही.एस. कुलकर्णी उदगीरलोकांच्या मनाची नाडी ओळखून जनसामान्यांच्या प्रश्नांना, प्रसंगी आक्रमक मार्ग स्वीकारुन तडीस लावणारा नेता... अशी माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांची ओळख होती़ जनतेच्या प्रश्नांसाठी वेगवेगळी आयुधे वापरत प्रसंगी पहाड फोडणाऱ्या या नेत्याचा वाढदिवस म्हणजे एक वार्षिक उत्सव बनला होता़ राजकीय बळ नसताना स्वकर्तृत्वावर झेप घेऊन नगर परिषद ते विधान भवनापर्यंत मजल मारली. सर्वसामान्यांसाठी पहाड फोडणारा हा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविताना त्यांनी संघटनेला विधायक वळण देत विद्यापीठ पातळीवरची पदे भूषविली़ क्रीडा क्षेत्रात अधिक रस असलेल्या भोसले यांनी प्रियदर्शिनी युवक मंडळाची स्थापना करुन संस्मरणीय अशा राज्य व अखिल भारतीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा घडवून आणल्या़ भोसले यांच्या कार्याची राज्य शासनाने दखल घेऊन त्यांना शिवछत्रपती पुरस्काराने गौरविले होते़ हे करीत असतानाच मोठे बंधू कै़ विलास भोसले यांच्या आकस्मित निधनाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली होती़ अशातच उदगीर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या कार्याची कक्षा वाढविली़ नगर परिषदेच्या राजकारणातील त्यांची धडाडी व संघटन कौशल्य पाहून उदगीरचे तत्कालीन आमदार कै़ नारायणराव पाटील गुडसूरकर यांनी भोसले यांना नगर परिषदेत अधिक गुंतवून न ठेवता त्यांना सोबत घेऊन चंद्रशेखर भोसले हेच उदगीर मतदारसंघाचे उद्याचे नेतृत्व असल्याचे एका जाहीर सभेतून ठणकावून सांगितले होते़हा सल्ला मानून भोसले यांनी गावागावांतून कै़ विलास भोसले मित्रमंडळाच्या शाखा स्थापन केल्या़ या शाखेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी गावोगावी पशुरोग निदान शिबिरे आयोजित करुन शेतकऱ्यांचे व लोकांचे अडले नडलेले प्रश्न सोडवू लागले़ गावातल्या या शाखा म्हणजे गरजू लोकांची ही मदत केंद्रे ठरली होती़ हे कार्य चालू असतानाच प्रेरणास्थान असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अखिल भारतीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांना व हाकेला ओ देण्याचे काम भोसले यांनी सातत्याने केले़ विकास नाही म्हणून ओरडत बसण्यापेक्षा विकसितांचा अभ्यास करुन त्यांच्या पाऊलवाटेवर चालण्याचा संकल्प चंद्रशेखर भोसले यांनी आमदारकीच्या प्रारंभीच व्यक्त केला होता़ त्या दृष्टीने होणारी त्यांची वाटचाल मतदारांना दिलासा देणारी ठरली होती़ जनता दल, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अशा विविध पक्षात राहून काम केल्यानंतर त्यांनी जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले तत्कालीन केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता़ जनतेच्या प्रश्नासाठी पहाड फोडण्याचे प्रयत्न करणाऱ्या या नेत्याला मंगळवारी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला़