शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 20:18 IST

अशा मंत्र्याचा राजीनामा घेऊन त्यांना रमी खेळण्यासाठी कायमस्वरुपी घरी बसवा, अशी आपली मुख्यमंत्र्याकडे मागणी असल्याचे आ.दानवे म्हणाले.

बापू सोळुंके/  छत्रपती संभाजीनगर: पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे, शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असताना राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मात्र विधीमंडळात रमी खेळत असल्याचे दिसले. अशा असवंदेनशील कृषीमंत्र्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा घ्यावा,आणि त्यांना रमी खेळण्यासाठी घरी बसवा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

आ. दानवे म्हणाले की, पावसाअभावी राज्यातील शेतकऱ्यांवर दुबारपेरणी करावी लागत आहे, दुसरीकडे त्यांना बोगस बियाणे मिळाल्याच्या तक्रारीही आहेत, असे असताना राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात रमी खेळत असल्याची व्हिडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाली. किती ही असंवेदनशिलता आहे हे यानिमित्ताने दिसून येते. असले लोक मंत्रीमंडळात आहे हे राज्याचे दुर्देवच म्हणावे लागेल. कोकाटे यांनी कृषीमंत्रीपद म्हणजे आधी ओसाड गावची पाटिलकी, असे विधान केले होते. तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ते कसले ढेकळाचे पंचनामे करायचे असे म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले होते. असा असंवेदनशिल मंत्री मंत्रीमंडळात आहे, याचा अर्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची काहीतरी मजबुरी असेल, असा टोला त्यांनी लगावला. अशा मंत्र्याचा राजीनामा घेऊन त्यांना रमी खेळण्यासाठी कायमस्वरुपी घरी बसवा, अशी आपली मुख्यमंत्र्याकडे मागणी असल्याचे आ.दानवे म्हणाले.

आमचे नेते उघडपणे भेटतात, बोलतात

आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते एका हॉटेलमध्ये भेटल्याने युतीचे संकेत आहे का,असे विचारले असता असता आ. दानवे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते त्या हॉटेलमध्ये गेले होते. तेथे मुख्यमंत्री त्यांच्या कामानिमित्त गेले. ठाकरे हे उघडपणे भेटणारे बोलणारे आहेत. ते दोघेही योगायोगाने एकाच हॉटेलमध्ये गेल्याचे सांगून दानवे यांनी या भेटीवर पडदा टाकला.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेManikrao Kokateमाणिकराव कोकाटे