शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

लक्ष्मीपूजनाने उत्साहात भर

By admin | Updated: October 31, 2016 00:59 IST

परभणी : रविवारी जिल्हाभरात ठिक ठिकाणी लक्ष्मीपूजन करण्यात आले़

परभणी : रविवारी जिल्हाभरात ठिक ठिकाणी लक्ष्मीपूजन करण्यात आले़ भक्तीभावाने लक्ष्मीची पूजा करून त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली़ त्यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय आणि उत्साहाचे झाले होते़ दोन दिवसांपासून जिल्ह्यात दिवाळी सणाला प्रारंभ झाला आहे़ ऊर्जेचे आणि उत्साहाचे प्रतिक असलेल्या या दीपोत्सवात दररोज विविध सण साजरे केले जातात़ रविवारी लक्ष्मीपूजन असल्याने सकाळपासूनच नागरिकांनी जोरदार तयारी केली़ शहरातील बाजारपेठ भागात केळीचे खांब, केळीचे पाने, झेंडुची फुले, पुजेचे साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती़ शनिवारनंतर रविवारी देखील बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेल्याचे पहावयास मिळाले़ लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सायंकाळचा असल्याने दुपारी २ वाजेपासूनच लक्ष्मीपूजनाची तयारी होत होती़ घरोघरी सायंकाळच्या सुमारास रांगोळ्या रेखाटून आणि पणत्यांचे दिवे लावण्यात आले़ शहरातील बाजारपेठ भागातही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांसमोर रांगोळ्या काढल्या़ दुकानांना झेंडुच्या फुलांची तोरणे बांधून सजविण्यात आले़ त्यानंतर लक्ष्मीपूजन करण्यात आले़ व्यापाऱ्यांनी लक्ष्मीपूजनासह त्यांच्या वर्षभराच्या नोंद वह्या, पावती पुस्तके, पेन आदी साहित्याचे पूजन झाले़ सायंकाळी ५़३० पासून जिल्ह्यात लक्ष्मीपूजनाचा प्रारंभ झाला़ रात्री ९़३० पर्यंत विविध भागात लक्ष्मीपूजनाचे कार्यक्रम पार पडले़लक्ष्मीपूजनामुळे सायंकाळी शहरात सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण शहर फटाक्याच्या आतषबाजीने उजळून निघाले होते. उत्साहपूर्ण आणि भक्तीभावाने रविवारी जिल्ह्याभरात लक्ष्मीपूजन साजरे करण्यात आले. (प्रतिनिधी)