शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

महसूल वाढीच्या प्रयत्नांना तलाठ्यांनी दिला खो

By admin | Updated: June 2, 2014 01:34 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद शासनाचा महसूल वाढविण्यासाठी नगररचना विभागाने शहरालगतच्या गावांचे गटनिहाय बाजारमूल्य निश्चित करण्याचे काम हाती घेतले आहे.

सुनील कच्छवे , औरंगाबाद शासनाचा महसूल वाढविण्यासाठी नगररचना विभागाने शहरालगतच्या गावांचे गटनिहाय बाजारमूल्य निश्चित करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी तलाठ्यांकडून आवश्यक माहिती मागविण्यात आली आहे. मात्र, महिना उलटूनही एकाही तलाठ्याने ही माहिती दिलेली नाही. त्यामुळे गटनिहाय बाजारमूल्य निश्चित करण्यात अडचणी येत आहेत. नगररचना (मूल्यांकन) विभागाच्या वतीने दरवर्षी जमिनीचे शासकीय दर निश्चित केले जातात. सध्या जिल्ह्याचे २०१५ सालाचे बाजारमूल्य निश्चित करण्याचे काम सुरू आहे. सहायक संचालक कार्यालयातर्फे जूनअखेरीस हे मूल्य निश्चित करून त्याचा अहवाल पुणे येथील वरिष्ठ कार्यालयाला सादर केला जाणार आहे. बहुतेक ग्रामीण भागात गावात सरसकट एकच दर आकारले जातात. जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना हाच दर गृहीत धरून त्यानुसार मुद्रांक व नोंदणी शुल्क आकारले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांत औरंगाबाद शहराजवळील गावांची झपाट्याने वाढ होत आहे. अनेक बांधकाम व्यावसायिक या गावांकडे वळले असून, तेथे मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. हे लक्षात घेऊन नगररचना विभागाने या गावांचे गटनिहाय बाजारमूल्य निश्चित करण्याचे ठरविले आहे. ज्या गटांमध्ये बांधकाम प्रकल्प किंवा अकृषक परवानगी घेतली गेली त्या ठिकाणचे बाजारमूल्य वाढविण्यासाठी हे काम केले जात आहे. त्यामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. गटनिहाय बाजारमूल्य निश्चित करण्यासाठी संबंधित गावांमधील जमिनीच्या प्रकाराची गटनिहाय माहितीही आवश्यक आहे. त्यासाठी सहायक संचालक कार्यालयाने महिनाभरापूर्वी तलाठ्यांना पत्र पाठवून ही माहिती मागविली. औरंगाबाद शहराजवळील ५१, खुलताबाद तालुक्यातील ५, वैजापूर तालुक्यातील ५, सिल्लोड तालुक्यातील ६, सोयगाव तालुक्यातील ४, कन्नड तालुक्यातील ५, पैठण तालुक्यातील १२ आणि गंगापूर तालुक्यातील १९ गावांची माहिती मागविण्यात आली आहे. मात्र, महिना उलटला तरी एकाही तलाठ्याने अद्याप ही माहिती सादर केलेली नाही. या गावांची होणार गटनिहाय बाजारमूल्य निश्चिती सातारा, देवळाई, बाळापूर, गांधेली, हनुमंतगाव, सहजापूर, वडगाव कोल्हाटी, तीसगाव, पंढरपूर, वळदगाव, पाटोदा, गोलवाडी, गंगापूर नेहरी, दौलताबाद, रावरसपुरा, शेंद्रा कमंगर, सुंदरवाडी, फत्तेपूर, हिरापूर, पिसादेवी, सावंगी, झाल्टा, गेवराई, कुंभेफळ, ओहर, अंतापूर, अश्रफपूर, दौलतपूर, गोपाळपूर, जटवाडा, कृष्णापूरवाडी, मल्हारपूर, मांडकी, सुलतानपूर, तुळजापूर, कच्चीघाटी, सैजतपूर, गिरनेरा, आडगाव, बागतलाव, वरूड, गंगापूर जहांगीर, शेंद्राबन, हिवरा, टोणगाव, लाडगाव, करमाड, शरणापूर, वंजारवाडी, चौका, शेकटा.