इंधन बचत काळाची गरज असून देश आजही इंधनाची मोठ्या प्रमाणात आयात करतो. त्यामुळे इंधन बचत एकट्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी नसून सर्वांचे कर्तव्य आहे, असे मत उपप्राचार्य विशाल साबणे यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात विशाल गायकवाड म्हणाले की, सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने लालपरीकडे विश्वासार्हतेने पाहिले जाते. महामंडळाचे चालक स्वतःचे वाहन समजून इंधन बचत करतात, ही अभिमानाची बाब आहे.
यावेळी विभागीय कामगार अधिकारी एकशिंगे, सहअधीक्षक राजेंद्र सोनवणे, रुग्णकल्याण समितीचे अतुल रासकर व सुनील कुंठारे, शाखेर पठाण, ज्ञानेश्वर कदम, गणेश ठोंबरे, दिलीप वेदपाठक, दीपक माळी, इब्राहिम खान, अमजद शेख आदी उपस्थित होते.
-- गंगापूर : रा. प. महामंडळाच्या इंधन बचत मोहिमेच्या प्रारंभप्रसंगी उपस्थित मनीष जावळेकर, विशाल गायकवाड, विशाल साबणे आदी.