औरंगाबाद : वॉर्ड क्र. ५३ बारी कॉलनी येथील बायजीपुरा गल्ली नं.३२ येथे व वॉर्ड क्र.४१ शहाबाजारात औरंगाबाद पूर्वचे आमदार व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या आमदार निधीतून तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते. या दोन्ही भागांत हे रस्ते तयार होण्याच्या आधी आणि आताची परिस्थिती याबद्दल नागरिकांमध्ये चर्चा होती आणि या विकासकामांबद्दल त्यांनी प्रचंड समाधान व्यक्त केले.या दोन्ही रस्त्यांच्या उद्घाटन सोहळ्यास स्वत: शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा हे आवर्जून उपस्थित होते. स्वत:चा आमदार निधी, मोठे बंधू विजय दर्डा यांचा खासदार निधी, मुख्यमंत्री निधी, विशेष निधी अशा कुठल्या ना कुठल्या, निधीतून संपूर्ण पूर्व मतदारसंघात धडाक्यात ही विकासकामे होत असल्याने नागरिकांच्या मनात राजेंद्र दर्डा यांच्याबद्दल कमालीची जिव्हाळ्याची भावना निर्माण झालेली बघावयास मिळत आहे. बायजीपुरा गल्ली नं.३२ मधील उद्घाटनास माजी नगरसेविका शमशाद बेगम, अमजद खान, शरीफलाला, मन्सूरभाई, हिदायत खान यांच्यासह शेकडो स्त्री- पुरुष नागरिकांची उपस्थिती होती. संपूर्ण गल्लीत हा रस्ता झाल्याने तेथील नागरिकांचा मोठा त्रास आता कमी झाला आहे. वॉर्ड क्र.४१ मध्ये नगरसेवक मीर हिदायत अली यांच्या संपर्क कार्यालयापासून ते महादेवपर्यंतचा रस्ता आता चकाचक झाला आहे. शेख रफिकभाई यांच्या घरापासून ते कांताबाई यांच्या घरापर्यंतचा रस्ताही चकाचक झाला आहे. या सिमेंट रस्त्यांच्या उद्घाटनप्रसंगी मो. रफिक, अन्वर खान, असिफ खान, शेख फय्याज, हिब्बूभाई, संतोष रताळे, सय्यद फिरदोसअली आदींची उपस्थिती होती. या भागातील रस्ते अत्यंत खराब होते. त्यावर अंथरलेली गट्टू खराब होऊन गेली होती. आता हे सिमेंटचे रस्ते झाल्याने तेथील नागरिकांनी राजेंद्र दर्डा यांचे मनापासून आभार मानले.
बायजीपुरा व शहाबाजारात सिमेंट रस्त्यांचे लोकार्पण
By admin | Updated: July 22, 2014 00:50 IST