लातूर : लातूर पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या शीतल फुटाणे तर उपसभापतीपदी दत्ता शिंदे यांचा विजय झाला आहे. सभापती व उपसभापती निवडीसाठी मंगळवारी मतदान झाले. भाजप व काँग्रेस दोघांनीही सभापती व उपसभापती पदांसाठी अर्ज दाखल केले होते. २० सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीत एक सदस्य गैरहजर होता. त्यामुळे काँग्रेसला १२ व भाजपाला ७ मते मिळाली.लातूरचे सभापती पद ओबीसी महिलेसाठी राखीव होते. मंगळवारी सभापती व उपसभापती पदासाठी काँग्रेसकडून गंगापूर गणातील शीतल फुटाणे यांचा सभापती पदासाठी तर उपसभापती पदासाठी काटगाव गणातील दत्ता शिंदे यांनी अर्ज दाखल केला. भाजपाकडून भातांगळी गणातील अनिता बालवाड यांचा सभापती पदासाठी तर गाधवड गणातील भैरवनाथ पिसाळ यांनी उपसभापती पदासाठी अर्ज होता.
लातूर : सभापतीपदी शीतल फुटाणे
By admin | Updated: March 14, 2017 23:52 IST