शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकासात लातूर पॅटर्न

By admin | Updated: August 17, 2014 01:04 IST

लातूर : महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रांत विकास साधत आघाडी घेतली आहे. ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांमध्ये लातूर जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे,

लातूर : महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रांत विकास साधत आघाडी घेतली आहे. ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांमध्ये लातूर जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी येथे केले.भारतीय स्वातंत्र्याच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलावर पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मंचावर राज्यमंत्री अमित देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, आमदार वैजनाथ शिंदे, महापौर स्मिता खानापुरे, अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, सामाजिक, राजकीय, साहित्य, संस्कृती अशा विविध क्षेत्रांत प्रगती करीत देशाच्या विकासात राज्याने सिंहाचा वाटा उचलला आहे. लातूरचे भूमिपुत्र पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री आ.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या दूरदृष्टी व अथक प्रयत्नाने जिल्ह्याने यशाची शिखरे गाठली आहेत. पावसाच्या अनियमिततेमुळे राज्यात पिके व पाणीसाठ्याचा प्रश्न उद्भवला आहे. या टंचाईचा सामना करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. मतदानाच्या मूलभूत हक्कांबाबत जागरुक राहून मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा पात्र गरजूंनी लाभ घेत राष्ट्र व राज्य निर्माणाच्या कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी यांना गौरविण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक वनीकरण, बॉम्बशोध नाशक पथक, अग्निशमन दल, आरोग्य, शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन आदी विभागांनी तयार केलेले चित्ररथ संचलनात सहभागी झाले होते. कार्यक्रमास स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘ पाणी साठवा, गाव वाचवा’ही योजना नुकतीच शासनाने सुरू केली आहे. या अंतर्गत भूजल पातळी वाढविण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. जिल्ह्यात २ लाख ४४ हजार ३९१ गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना १२२ कोटी ५० लाख रुपये अर्थसहाय्यक दिले आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १४५ कोटी, अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत ७५ कोटी ५९ लाख आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेअंतर्गत २ कोटी ७१ लाख ५६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली. अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात १६ लाख ७९ हजार ७५१ नागरिकांना लाभ मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर विविध विभागातील चांगल्या कामाचे कौतुक केले.