हणमंत गायकवाड , लातूरलातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा आणि दोन विधान परिषदेतील आमदारांनी चालू आर्थिक वर्षात १६ कोटींच्या कामांना मंजुरी घेतली असून, बाहेर जिल्ह्यातील सहा आमदारांनीही १ कोटी २३ लाख ८९ हजारांचा निधी दिला आहे़ जलसंधारणाच्या कामाबरोबर ग्रंथालय आणि शैक्षणिक साहित्यासाठी हा निधी देण्यात आला आहे़ गतवर्षीही सहा आमदारांनी ४१ लाख ४४ हजारांचा निधी दिला होता़ यावर्षी १ कोटी २३ लाख ८९ हजारांचा निधी मिळाला आहे़ विधान परिषदेतील आमदार शरद रणपिसे यांनी गतवर्षी ३ लाखांचा निधी दिला होता़ तर आमदार सतीश चव्हाण यांनी ५ लाख, भाई गिरकर यांनी ३ लाख, मुजफ्फर हुसेन यांनी ५ लाख आणि राणाजगजितसिंह पाटील यांनी ४ लाख ९८ हजारांचा निधी दिला होता़ यातील बहुतांश निधी जलसंधारणाच्या कामासह शैक्षणिक उपक्रमांना देण्यात आला होता़ यंदा २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी डॉ़ नीलमताई गोऱ्हे, महादेव जानकर, सतीश चव्हाण, शरद रणपिसे, भाई जयंत पाटील, भाई गिरकर यांनी निधी दिला आहे़ या सहा आमदारांनी १ कोटी २३ लाख ८९ हजार रुपयांचा निधी लातूरच्या विकास कामांसाठी दिला आहे़ त्यांनी सुचविलेल्या विकास कामांची यादीही मंजूर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी बी़एसक़ोलगणे यांनी दिली़ ग्रंथालय व ग्रंथालयातील साहित्य खरेदी तसेच जलयुक्त शिवार योजनेसाठी हा निधी मिळाला असल्याचेही कोलगणे यांनी सांगितले़ बाहेर जिल्ह्यातील आमदारांचा निधी मिळत असल्याने लातूरच्या विकास कामासाठी मदत होत आहे.
बाहेरच्या आमदारांचाही लातूरला मिळाला निधी
By admin | Updated: March 19, 2016 00:56 IST