शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
5
iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
6
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
7
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
8
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
9
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
10
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
11
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
12
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
13
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
14
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
15
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
16
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
17
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
18
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
19
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
20
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा

लता मंगेशकरांनी आंबेडकरांचे गाणे गायले नाही : रविचंद्र हडसणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 14:02 IST

‘तुम्ही दगडांचीच गाणी गा, माणसाची गाणी नका गाऊ’ वामनदादा कर्डक यांनी व्यक्त केली होती खंत

ठळक मुद्देलतादीदींना भेटण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी जेवण दिले. मात्र, गाणे काही गायले नाही.प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ, राजा ढाले यांनीही प्रयत्न केलेविद्यापीठातील वामनदादा कर्डक अध्यासन केंद्रातर्फे व्याख्यानात प्रसिद्ध कवी डॉ. रविचंद्र हडसणकर यांची माहिती

औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील एक तरी गाणे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गावे अशी महाकवी वामनदादा कर्डक यांची आंतरिक इच्छा होती. त्यातूनच वामनदादा आणि मी लतादीदींना भेटण्यासाठी गेलो. त्यांनी जेवण दिले. मात्र, गाणे काही गायले नाही. प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ, राजा ढाले यांनीही प्रयत्न केले, तरीही गाणे काही गायले नाही. तेव्हा वामनदादांनी ‘तुम्ही दगडांचीच गाणी गा, माणसाची गाणी नका गाऊ’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त केल्याची आठवण प्रसिद्ध कवी डॉ. रविचंद्र हडसणकर यांनी सांगितली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्रातर्फे वामनदादांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन महात्मा फुले सभागृहात मंगळवारी केले होते. प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. राहुल म्हस्के, साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे, संचालक डॉ. युवराज धबडगे उपस्थित होते. 

‘वामनदादा कर्डक : व्यक्ती आणि कार्य’ या विषयावर बोलताना डॉ. हडसणकर म्हणाले, संस्कृतीच्या ठेकेदारांनी अनेक वर्षे दीन, दलित, वंचितांचे जीवन गीत-संगीत रागदरबारातून दूरच ठेवले होते. अशा काळात वंचित समाजाचे दु:ख प्रभावीपणे मांडून वामनदादा कर्डक हे खऱ्या अर्थाने महाकवी ठरले. बाबासाहेबांच्या प्रेरणेतून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अनेक जण उभे राहिले. लेखन, गायन व लढ्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचा विचार अनेकांनी समर्थपणे पुढे नेला. हाच विचार घेऊन वामनदादांनी गीते, कविता लिहिल्या. प्रस्थापित लेखक, कलावंत मंडळी उपेक्षितांचे दु:ख मांडण्याचे टाळत होती. तेव्हा वामनदादांनी ‘उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’ या शब्दात वंचितांच्या जीवनात प्रकाशाची पेरणी केली. बाबासाहेबांचा लढा हा त्यांच्या गाणी, कवितांच्या माध्यमातून मांडला. त्यांनी शेती, कष्टकरी, महिला यांच्यावरील गाण्यासोबतच प्रेम, विरहाचीही गीते लिहिली. ‘सांगा या वेडीला, गुलछडीला’, ‘करिते पूजा मी गौतमाची’, ‘नदीच्या पलाड बाई झाडी लई दाट-तिथूनच जाते माझे माहेराची वाट’, अशी अनेक अजरामर गाणी लिहिली, असल्याचेही डॉ. हडसणकर यांनी सांगितले. यावेळी प्रा. राहुल म्हस्के यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांनी केला. संचालक डॉ. धबडगे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. वि.दा. मस्के यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. बाबासाहेब गायकवाड यांनी आभार मानले. या कार्यक्रमात मोतीराज राठोड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरLata Mangeshkarलता मंगेशकरDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद