शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

मृताची अखेरची इच्छा पूर्ण; अनेक अडचणी असूनही कोरोनाकाळात पहिले देहदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 8:21 PM

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्चपासून देहदान झालेले नाही.

ठळक मुद्देखाजगी रुग्णालयाच्या मदतीने केले नेत्रदानहीनातेवाईकांनी केली मृताची अखेरची इच्छा पूर्ण

औरंगाबाद : वडिलांनी देहदान केलेले. त्यांच्याप्रमाणे मुलानेही देहदान करण्याची इच्छा नातेवाईकांकडे व्यक्त केली होती. दुर्दैवाने मुलाचा गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. मात्र, कोरोनाच्या विळख्याने देहदान करण्यास अनेक अडचणी होत्या. अखेर सर्व अडचणी दूर करून नातेवाईक, आरोग्य यंत्रणेमुळे मृताची अखेरची इच्छा पूर्ण झाली आणि कोरोनाकाळात पहिले देहदान झाले.

विवेक श्रीकृष्ण चोबे (५५, रा. श्रेयनगर), असे देहदान झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्चपासून देहदान झालेले नाही. खबरदारी म्हणून मृत्यूनंतर देहदान घेण्याचे थांबविण्यात आले होते. विवेक चोबे यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी वडिलांप्रमाणे मृत्यूनंतर आपलेही देहदान करावे, अशी इच्छा कुटुंबियांकडे व्यक्त केली होती. कोरोनामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण होणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 

याविषयी नातेवाईकांनी औरंगाबाद युथ सोशल वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि ‘झेडटीसीसी’चे सदस्य राजेशसिंह सूर्यवंशी यांना माहिती दिली. त्यानंतर खाजगी रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांचे नेत्रदान केले; परंतु देहदान करण्यासाठी अडचण होती, ती मृत रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, याचे निदान होण्याची. त्यांनी याविषयी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, डॉ. प्रतिमा कुलकर्णी, डॉ. अमरज्योती शिंदे यांच्याशी संपर्क केला. अखेर मनपाच्या पथकाने मृताच्या घरी जाऊन कोरोनाची तपासणी केली. अहवाल निगेटिव्ह आला आणि अखेर घाटीत देहदान झाले. घटीतर्फे नातेवाईकांना देहदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी प्रा. रवी पाटील, प्रा. चंपालाल कहाटे, डॉ. मंगेश मोरे, डॉ. पल्लवी चव्हाण आदी उपस्थित होते.

पहिले देहदानकोरोनाच्या कालावधीतील पहिले देहदान झाले. त्यासाठी मयताची अँटिजन टेस्ट करण्यात आली. अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे देहदान शक्य झाले. - डॉ. प्रतिमा कुलकर्णी, शरीररचनाशास्त्र विभाग, घाटी

इच्छा पूर्ण करता आली...हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात जाईपर्यंत निधन झाले होते. त्यांच्या इच्छेप्रमाणे देहदान केले. त्यांची इच्छा आम्हाला पूर्ण करता आली, याचे मोठे समाधान आहे.  - डॉ. श्रुती चोबे, सून

टॅग्स :AurangabadऔरंगाबादOrgan donationअवयव दानdoctorडॉक्टर