शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आडनाव अखेर दुरूस्त

By admin | Updated: December 11, 2014 00:44 IST

बीड : निवडणूक विभागाकडून झालेल्या आडनावातील चुकीमुळे एका विवाहित महिलेचे किडणीचे आॅपरेशन रुकले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.

बीड : निवडणूक विभागाकडून झालेल्या आडनावातील चुकीमुळे एका विवाहित महिलेचे किडणीचे आॅपरेशन रुकले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. अखेर बुधवारी या आडनावात दुरुस्ती करून ‘थपाटे’चे ‘धपाटे’ करण्यात आले. या दुरुस्तीमुळे मीनाक्षीच्या जीवनात एक नवी पहाट येणार आहे.वडवणी तालुक्यातील परडी माटेगाव येथे मीनाक्षी रामेश्वर धपाटे हे कुटूंब वास्तव्यास आहे. रामेश्वर यांचा २०१० साली मीनाक्षी सोबत विवाह झाला. मात्र पहिल्या अपत्यादरम्यान तिची किडणी खराब असल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. यासाठी दीड लाख रुपये खर्च येत होता. रामेश्वर धपाटे यांची परिस्थिती हलाकीची होती, म्हणून त्यांनी शासनाच्या राजीव गांधी जीवनदायिनी आरोग्य योजनेच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले होते.त्याप्रमाणे ते शिर्डी येथे गेले. मात्र निवडणूक विभागाकडून मतदान ओळखपत्रावर ‘धपाटे’चे ‘थपाटे’ झाले. रेशनकार्ड आणि मतदान कार्डवरील नावात तफावत आल्याने मीनाक्षीचे आॅपरेशन रुकले होते. नावातील दुरुस्तीसाठी अनेकवेळा तहसील कार्यालयात खेटे मारूनही काम होत नसल्याने धपाटे पार खचले होते.तहसीलदार एन.जी.झंपलवाड, नायब तहसीलदार एस.डी.चऱ्हाटे, शेख रफीक यांनी आडनावातील दुरूस्ती केली. (प्रतिनिधी)केवळ आडनावातील चुकीमुळे माझ्या पत्नीची शस्त्रक्रिया रुकली होती. मात्र आता नावातील दुरूस्ती झाली असून अवघ्या तीन दिवसात मीनाक्षीचे आॅपरेशन करणार असल्याचे पती रामेश्वर धपाटे यांनी सांगितले. त्यांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले़