शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षबागांना अखेरची ‘घरघर’

By admin | Updated: June 12, 2014 01:36 IST

एस़आऱमुळे , शिरूर अनंतपाळ असंतुलित पर्जन्यमान कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी, सोबतच गारपीटीचा तडाखा यामुळे तालुक्यातील द्राक्ष बागायतदार मोठ्या अडचणीत आले

एस़आऱमुळे , शिरूर अनंतपाळअसंतुलित पर्जन्यमान कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी, सोबतच गारपीटीचा तडाखा यामुळे तालुक्यातील द्राक्ष बागायतदार मोठ्या अडचणीत आले असून, सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा फटका बसत असल्याने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील द्राक्ष बागांना अखेरची घरघर लागली आहे़ परिणामी पंचेवीस हेक्टर्सवरील द्राक्ष बागा मोडित निघाल्याचे चित्र दिसून येत आहे़ शिरूर अनंतपाळ तालुक्यातील घरणी, साकोळ डोंगरगाव, पांढरवाडी आदी प्रकल्पांमुळे सिंचन क्षेत्र वाढले असले तरी तालुक्यातील फळबागा मात्र घटत चालल्या आहेत़ दहा वर्षापासून तालुक्यात जवळपास २५ हेक्टर्स जमिनीवर द्राक्ष बागेची लागवड करण्यात आली होती़ यात थेरगाव, लक्कडजवळगा, शेंद, कानेगाव, शिरूर अनंतपाळ, येरोळ आदी गावांचा समावेश सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा फटका बसत आहे़ त्यातच त्यांना शासनाकडून फारशी मदत मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत येत आहेत़ गत दोन-तीन वर्षापासून तालुक्यात अनावृष्टी झाल्याने मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले होते़ तर पाणी पातळी खालावल्याने विहिर, बोअर कोरडेठाक पडले होते़ तेव्हा टँकरने पाणी पुरवठा करून द्राक्ष बागा जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न शिरूर अनंतपाळचे द्राक्ष बागायतदार शेतकरी गुरुनाथ सिंदाळकर यांनी केला होता़ परंतु, मार्च महिन्यात झालेल्या गारपीटीने तर त्यांची द्राक्ष बाग पूर्णत: उद्धवस्त झाली़ त्याचा पंचनामा झाला परंतु, मदत मात्र अद्यापि मिळाली नसल्याने त्यांनी दोन हेक्टर्स द्राक्ष बाग मोडून काढण्यासाठी मजुरांना गुत्ते दिले असल्याचेही सिंदाळकर यांनी सांगितले़५१ हजाराला गुत्ते़़़ द्राक्ष बागेस गारपीटीचा फटका बसल्याने द्राक्षाचे मोठे नुकसान झाले़ लागवडीचा खर्चसुद्धा पदरी पडला नसल्याने आगामी खरीप हंगामातील तरी पिके पदरी पडतील या अपेक्षेने ५१ हजार रूपयास भिवाजी चव्हाण या मजुरास गुत्ते देऊन बाग मोडीत काढण्याचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले़ असाच काहीसा कटू अनुभव इतर गावातील शेतकऱ्यांना आला असल्यानेच एकंदर २५ हेक्टर्सवरील द्राक्ष बागा मोडित निघाल्या आहेत़केवळ एक हेक्टर शिल्लक़़़तालुक्यात सर्व प्रकारचे आघात सहन करून शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला होता़ परंतु, मार्च महिन्यात सतत अठरा दिवस गारपीट झाली़ त्यानंतरही आजतागायत वादळी पावसाचा तडाखा सुरुच असल्याने अनेक गावातील बागा मोडित निघाल्या आता केवळ एक हेक्टर्स द्राक्ष बाग शिल्लक राहिल्याचे चित्र दिसत आहे़योग्य दर नाहीत़़़याबाबत येथील तालुका कृषी अधिकारी डी़बी़सुतार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, नैसर्गिक आपत्ती हे तर प्रमुख कारण आहेच त्याचबरोबर महागाई मजुरांची समस्या आणि लागवडीचा खर्च वाढला़ परंतु, द्राक्षांना योग्य दर मिळत नसल्याने द्राक्ष बागा मोडित निघत आहेत़