शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

जाणकारातूनही ‘जर-तर’ची भाषा!

By admin | Updated: October 8, 2014 00:48 IST

जालना : लोकसभा निवडणुकीची गणिते या विधानसभा निवडणुकीत पूर्णत: बिघडल्याने राजकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्तिसुध्दा आता ‘जर-तर’ ची भाषा बोलू लागले आहेत.

जालना : लोकसभा निवडणुकीची गणिते या विधानसभा निवडणुकीत पूर्णत: बिघडल्याने राजकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्तिसुध्दा आता ‘जर-तर’ ची भाषा बोलू लागले आहेत.लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस-आघाडी विरुध्द महायुतीत जोरदार टक्कर होईल, असे अपेक्षित होते. राजकीय क्षेत्रातील जाणकार सुध्दा सत्तारुढ आघाडी विरोधात वातावरण असल्याचा निर्वाळा देत होते. परंतू महायुती मोठ्या मताधिक्याने मुसंडी मारेल, हे सांगण्यास धजावत होते. या पार्श्वभूमीवरच त्या निवडणुकीत ‘मोदी’ लाटेत कॉँग्रेस जणांचा अक्षरश: सफाया झाला. त्या लाटेवर महायुतीचे उमेदवार सहजपणे स्वार झाले. एकूण ते निकाल कॉँग्रेसजणांना धक्कादायक ठरलेच; परंतु, राजकीय क्षेत्रातील जाणकार सुध्दा चक्रावून गेले होते. गेल्या सहा महिन्यापूर्वीच्या निकालांचे सादपडसाद विधानसभा निवडणुकीत उमटतील, असा महायुती समर्थक , तर सहा-सहा महिने ‘मोदी’ लाट टिकणार नाही, असा कॉँग्रेस समर्थकांतून सूर उमटत होता. परंतु, महायुती व आघाडीत अनपेक्षितपणे फुट पडल्यानंतर मातब्बर उमेदवारांचे तोंडचे पाणी तर पळालेच; त्याबरोबर राजकीय क्षेत्रातील जाणकारांना सुध्दा हादरा बसला. महायुती व आघाडी यांच्यातच पारंपारिक लढती रंगतील, असा सूर आवळणाऱ्या जाणकारांनी लगेच सावधपणे मौनी भूमिका स्वीकारल्या. लोकसभेची गणिते या विधानसभा निवडणुकीत पूर्णत: बिघडल्याने राज्यासह या जिल्ह्यात सुध्दा प्रत्येक मतदारसंघात दुरंगी लढती बहुरंगी झाल्या आहेत. लढती बेरंग झाल्यानेच गोंधळावस्था निर्माण झाली आहे. कारण पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांबरोबर आता कालपर्यंतचे मित्र सुध्दा दंड थोपाटून उभे राहिल्याने मतविभागणीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषत: कोण कोणाच्या व्होट बॅँकेवर डल्ला मारेल, हे सांगणेच आता कठीण बनले आहे. प्रत्येक निवडणुकीत आपापल्या व्होट बॅँका समर्थपणे सांभाळणाऱ्या मातब्बरांना आता मित्र पक्षांचाच मोठा धसका आहे. कारण गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत गळ्यात गळे घालून, पडद्याआड निरनिराळ्या युक्त्या व डावपेच खेळून एकगठ्ठा मतदानासाठी प्रयत्न केलेल्या मित्रपक्षांना आता मित्रांच्याच ‘कुटीरउद्योगा’ला म्हणजेच मतांच्या पळवापळवीला रोख बसविण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. आपल्या हक्काचे प्रत्येक मत पदरात पाडून घेतांना विरोधी पक्षाच्याही व्होट बॅँकेवर डल्ला मारण्याकरिता नामी युक्त्या शोधाव्या लागणार आहेत. कालपर्यंतच्या महायुतीतील शिवसेना-भाजप तर राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेसचीही पारंपारिक व्होट बॅँक एकच आहे. त्यामुळेच मतांसाठी या चौघाही प्रतिस्पर्ध्यात चांगली रस्सीखेच रंगली आहे. त्यासाठी मातब्बरांसह नवख्याही उमेदवारांनी तन-मन-धनासह प्रतिष्ठाही पणास लावली आहे. या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत बदनापूर मतदार संघाने महायुतीस विक्रमी असे मताधिक्य दिले होते. तेथूनच महायुतीचा आत्मविश्वास उंचावला होता. दुर्दैवाने महायुतीत फुट पडली. त्यातील दोन्ही पक्ष समोरा समोर उभे राहिले. परिणामी जुनी गणिते अक्षरश: गळून पडली. आता स्वबळावर म्हणजे ‘ताकद’च दाखविल्याशिवाय पर्याय नाही. हे कालपर्यंतच्या महायुतीतील दोन्ही उमेदवारांना कळून चुकले आहे.त्यामुळेच उमेदवारी आता सावध पवित्रा स्वीकारला असून ते कुठेही बेताल विधाने करीनासे झाले आहेत. कोणालाही न दुखवण्याचे काम ग्रामीण भागात प्राधान्याने सुरु असून त्यामुळे या लढतीचे चित्रच बदलले आहे. (प्रतिनिधी)