शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भराडीच्या बाजारात पशुधनाची बेभाव विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:14 IST

हजारावर जनावरे आली विक्रीसाठी : दुष्काळ, पाणी -चारा टंचाईने बळीराजा हवालदिल

प्रमोद शेजूळभराडी : सिल्लोड तालुक्यात भीषण दुष्काळ, पाणी व चारा टंचाईने बळीराजा हवालदिल झाला आहे. भराडी येथील जनावरांच्या आठवडी बाजारात एक हजारावर जनावरे विक्रीसाठी आली होती. जनावरे जास्त व जनावरे घेणारे व्यापारी कमी आल्याने कवडीमोल भावात जनावरांची विक्री झाली.७० ते ८० हजारांची बैलजोडी हताश झालेल्या शेतकऱ्यांनी केवळ ४० ते ५० हजारात विकली.तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून सतत दुष्काळ आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांनी पशुधन विक्रीस काढले आहे. बाजारात पशुधन विक्रीचे प्रमाण वाढल्याने भाव दुपटीने घसरले आहेत. मागील महिन्यात जनावरे बाजारात येण्याचे प्रमाण कमी होते, मात्र आता प्रमाण वाढले आहे.काही शेतकरी चारा शोधण्यासाठी धावपळ करीत आहे. मात्र चाºयाचे भाव आकाशाला भिडले आहेत. ५०० ते ७०० रूपयाला मिळणारा कडबा आता २ ते ३ हजारात मिळत आहे. शिवाय कुट्टी करणे, वाहतूक खर्च हे सर्वसामान्य शेतकºयाला परवडणारे नाही. पाणी नसल्याने मकाची वाढ झाली नाही. यामुळे चारा कमी निघाला आहे. परजिल्ह्यात चारा मागणी वाढल्याने भाव वाढले आहेत. परजिल्ह्यात जाणारा चारा रोखला गेला तर किमान तालुक्यात शेतकºयांना चारा मिळेल. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.भराडी परिसरात मजुरांना काम नाही. रोजगार हमीची कामे अजून सुरु झाली नाही. कामाच्या शोधात मजूर परजिल्ह्यात जात आहेत. खरीप तर गेला रबीही नाही. तालुक्यातील अनेक गावांत पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. तालुक्यात दुष्काळ जाहीर असला तरी प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना अद्यापही सुरू झाल्या नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.चौकट...पशुपालकांच्या डोळ्यात अश्रूपोटच्या लेकरासारखा जीव लावलेले पशुधन बेभाव विकताना बळीराजाच्या डोळ्यात अश्रू येत होते. जनावरांचा उदरनिर्वाह कसा करावा, विकावे तर भाव नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत. विक्रीसाठी आलेली गुरांची वाढती संख्या दुष्काळाचे विदारक चित्र सांगत आहे.कोट......मुलासारखी जपलेली बैलजोडीदुष्काळी परिस्थितीमुळे इच्छा नसतानाही मुलासारखी जपलेली बैलजोडी कवडीमोल भावाने विक्री करावी लागली.- नाना जिजा शेजूळ, शेतकरी, रा. उपळी.व्यापारी झाले कसाईमाझ्याकडे चारा नाही. आगामी ६ महिने जनावरांचे पोट कसे भरावे, याची चिंता असल्याने ७० हजार रुपयांच्या बैलजोडीची व्यापाºयांनी केवळ चाळीस हजार रुपयांत बोली लावली. बाजारात जनावरे जास्त आल्याने व्यापारी कसाई झाले आहेत. त्यांनी कमी भावात जनावरे मागितली. नाइलाजाने ती विकावी लागली.- सोमनाथ रामभाऊ गुंजाळ, रा मांडगाव

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार