शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

पालिका-नागरिकांत समन्वयाचा अभाव !

By admin | Updated: January 18, 2015 00:32 IST

बीड : नगरपालिका व नागरिकांमध्ये समन्वयच नाही. त्यामुळे सुविधा सोयीस्कर होण्याऐवजी अडचणीच्या ठरत आहेत.

बीड : नगरपालिका व नागरिकांमध्ये समन्वयच नाही. त्यामुळे सुविधा सोयीस्कर होण्याऐवजी अडचणीच्या ठरत आहेत. केरकचरा, पाणी यासाठी पालिकेने योग्य नियोजन केले पाहिजे शिवाय नागरिकांनीही जबाबदाऱ्या ओळखायला हव्यात. पालिका व नागरिकांत समन्वय असेल तरच शहराचा गाडा व्यवस्थित चालू शकतो, असा निष्कर्ष ‘लोकमत’च्या वतीने शनिवारी आयोजित केलेल्या परिसंवादात निघाला. अवैध नळजोडण्या घेणाऱ्यांनी वैध करुन घ्याव्यात. स्वत:हून नळजोडण्या घेण्यासाठी पुढे यावे़ पाणीपुरवठा पाच दिवसांवरुन दोन दिवसावर आणण्याचा प्रयोग यापूर्वी केला होता;पण त्यामुळे अधिकच पाणी वाया जाऊ लागले. त्यामुळे हा प्रयोग थांबवावा लागला़- एम़ एस़ वाघ, पाणीपुरवठा अभियंता‘मुलभुत गरजा व समस्या’ या विषयावर आधारित परिसंवादात नगरसेवक अमृत सारडा, पालिकेचे स्वच्छता निरीक्षक युवराज कदम, पाणीपुरवठा अभियंता एम. एस. वाघ, अ‍ॅड. करुणा टाकसाळ, सामाजिक कार्यकर्ते ललित आब्बड, अमर नाईकवाडे, पंकज कुटे, डॉ. अनिल बारकूल यांचा सहभाग होता. ‘लोकमत’ने शहरातील पाणीटंचाई व कचरा हे दोन विषय ‘फोकस’ केले होते. त्यानुषंगाने झालेल्या परिसंवादात व्यवस्थापनापासून ते नागरिकांच्या जबाबदाऱ्या व करावयाचे उपाय यावर मनमोकळी चर्चा झाली. अधिकारी म्हणाले, नागरिकांचे सहकार्य नाही. अवैध नळजोडण्या आहेत. कारवाया करायला गेल्यावर लोेक तलवारी घेऊन अंगावर धावून येतात. नगरसेवक म्हणाले, मनुष्यबळ वाढवून सेवा सुरळीत करण्यात येईल. सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेला जबाबदार धरले. कचरा उचलून नेत नाहीत. पाणी पाच दिवसाला दोन तास सोडण्याऐवजी एक दिवसाआड एकच तास सोडावे. वकील, डॉक्टरांनीही पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन नागरिकांच्या जबाबदाऱ्यांवर प्रकाशझोत टाकला.तोट्या नाहीत, वसुलीही कमीपाणीपुरवठा विभागाचे अभियंता एम. एस. वाघ यांनी सांगितले,बीड शहराला २५ एमएलडी पाण्याचीगरज आहे. प्रत्यक्षात २८ एमएलडी पाणी सोडले जाते. तीन एमएलडी पाणी लिकेज व इतर कारणांमुळे वाया जाते. एका कुटुंबाला ६७५ लिटर पाणी देणे आवश्यक आहे;पण त्यापेक्षा जास्त पाणी दिले जाते. कुठे जादा दाबाने पाणी जाते तर कुठे कमी. मात्र, प्रत्येकवेळी पालिकेला दोष देणे उचित नाही. कारण अनेकदा वीज सुरळीत नसते. त्यामुळे पुरवठ्यावर परिणाम होतो. पालिकेकडून लिकेज दुरुस्ती केली जाते. काही ठिकाणी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून लिकेज आहे तसेच ठेवले जातात. फक्त पाणी वाया जाऊ नये म्हणून तोट्या बसविलेल्या आहेत. काळी जण नळाला विद्युतपंप बसवितात. गरजेपुरतेचे पाणी घेतले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.पालिकेकडे नाही नियोजन सामाजिक कार्यकर्ते पंकज कुटे यांनी पालिकेच्या कुचकामी यंत्रणेवर बोट ठेवले. कचरा वेळेवर उचलत नाहीत, घंटागाड्या उशिरा येतात. सकाळी सहा ते आठ या वेळेत महिला साफसफाई करुन कचरा फेकून देतात. काहीवेळा घंटागाड्या सकाळी दहानंतर येतात. तोपर्यंत काही महिला कामावर निघून जातात. घंटागाडी येऊनही उपयोग नाही. (प्रतिनिधी)