शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप

By admin | Updated: August 22, 2016 01:29 IST

परळी : द टर्निंग पाँईच्या वतीने रविवारी येथे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंतांचा गौरव सोहळा पार पडला. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे अध्यक्षस्थानी होत्या.

परळी : द टर्निंग पाँईच्या वतीने रविवारी येथे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंतांचा गौरव सोहळा पार पडला. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे अध्यक्षस्थानी होत्या. खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. संगीता ठोंबरे, आ. आर. टी. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू असलेले रमेश घोलप व अभिनेत्री सई ताम्हणकर हे कार्यक्र माचे खास आकर्षण होते.स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून द टर्निंग पाँईट हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू आहे. याअंतर्गत हा कार्यक्रम हालगे गार्डनमध्ये घेण्यात आला.२०१२ साली लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात अव्वल आलेले रमेश घोलप यांनी आपल्या यशाचा पट उलगडला. दीड वर्षांचा असताना पोलिओ झाला. बारावीत असताना वडीलांच्या निधनानंतर गावी जायला दोन रूपये नव्हते.मात्र, हार मानली नाही, असे ते म्हणाले.अभिनेत्री सई ताम्हणकर हिनेही खडतर परिश्रमाशिवाय यश मिळत नाही हे सोदाहरण स्पष्ट केले. ती म्हणाली, सांगलीतून मुंबईत आल्यावर पैसे नसायचे. आयुष्यात चांगले आणि वाईट टर्निंग पॉर्इंट येतात. अशा प्रसंगातून वाट काढणे महत्वाचे असल्याचा मंत्र तिने दिला. इतर मान्यवरांचीही भाषणे झाली.सूत्रसंचालन ज्ञानोबा सुरवसे, प्रास्ताविक प्रा. पवन मुंडे व आभार प्रदर्शन सचिन गित्ते यांनी केले. कार्यकर्ते, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)वडील गोपीनाथराव मुंडे असतानाच मी राजकारणात आले. परंतु माझे वर्तूळ मर्यादित होते. त्यांच्या अपघाती निधनाने माझ्याकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या. अनपेक्षितपणे मला वडिलांच्या भूमिकेत यावं लागलं हाच आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पाँईट असल्याचे पालकमंत्री पंकजा म्हणाल्या.