शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राष्ट्रवादीच्या मोर्चाकडे क्षीरसागर बंधुंची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:35 IST

राष्टÑवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा धडकत असताना दुसरीकडे पक्षाचेच स्थानिक लोकप्रतिनिधी आ. जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या गैरहजेरीची कुजबूज जोरदार घोषणाबाजीतही कानावर पडत होती.

सतीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : एकीकडे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर राष्टÑवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा धडकत असताना दुसरीकडे पक्षाचेच स्थानिक लोकप्रतिनिधी आ. जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या गैरहजेरीची कुजबूज जोरदार घोषणाबाजीतही कानावर पडत होती.नरेंद्र मोदीच्या प्रचंड झंझावातात आणि गोपीनाथराव मुंडे यांच्याबद्दलच्या सहानुभूतीच्या लाटेत जिल्ह्यात राष्टÑवादीची वाताहत होत असताना या क्षीरसागर बंधुंनी आपला बीड किल्ला अभेद्द राखला होता. या किल्ल्यासही शिवसंग्रामच्या विनायक मेटेंनी भगदाड पाडण्याचा प्रयत्न केला, निकराची झुंज दिली परंतु त्यांनाही यश आले नाही. विधानसभेची बीडची जागा राखत जयदत्त क्षीरसागर यांनी राष्टÑवादी काँग्रेसची लाज राखली होती. परंतु त्यानंतरच्या काळात राष्टÑवादीअंतर्गतचा कलह वाढत गेला. नगर परिषद, जिल्हा परिषद निवडणुकीत तर पक्षांतर्गतची गटबाजी उफाळून आली. ज्याप्रमाणे मुंडे आणि पंडितांच्या घरातील भाऊबंदकी जिल्ह्याने बघितली, त्याचाच कित्ता पालिका निवडणुकीत क्षीरसागर घराण्यात बघावयास मिळाला. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत चक्क डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याविरुद्धच सख्खे बंधू रवींद्र क्षीरसागर रिंगणात उतरले. क्षीरसागर घराण्यातील ही दरी आणखी वाढत गेली आणि त्याचा परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीतही पहावयास मिळाला. जि.प. निवडणुकीत पुतणे संदीप क्षीरसागर यांनी काकू-नाना आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा काकांनाच शह दिला. घरातील या कलहास बारामतीच्या पवारांचीच फूस होती, असा समज क्षीरसागर बंधूंचा झाला आणि त्यानंतर हे दोघेही दिवसेंदिवस राष्टÑवादी काँग्रेसपासून दूर होत गेले. ज्यांनी पक्षाच्याविरुद्ध कारवाया केल्या, त्यांनाच बारामतीच्या काका-पुतण्यांनी जवळ केले, असे दृष्य जिल्ह्याने बघितले. पुतण्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून काकांना शह देण्याचा प्रयत्न होता. पक्षविरोधी कार्य करणा-यांना कारवाईऐवजी शाबासकी दिली. ही गोष्ट न रुचल्याने त्यानंतरच्या राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांपासून क्षीरसागर बंधू दूर रहात गेले. काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. परंतु या मेळाव्याकडेही क्षीरसागर बंधूंनी पाठ फिरवली होती.आजच्या मोर्चातही आमदार आणि नगराध्यक्ष दोघेही अनुपस्थित राहिले. क्षीरसागर यांच्याप्रमाणेच अंबाजोगाईत नंदकिशोर मुंदडा हेही पक्षाचे नेते म्हणून ओळखले जातात. पक्षनिष्ठ असलेले नंदूसेठही या मोर्चात कुठे दिसले नाहीत.अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यासही नंदूसेठ देखील उपस्थित नव्हते. एकीकडे क्षीरसागर आणि नंदकिशोर मुंदडा यांचे पक्षाशी असलेले मतभेद वाढत असताना दुसरीकडे मात्र संदीप क्षीरसागर आणि उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर हे मात्र पक्षांतर्गतच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय झाले आहेत.जिल्ह्यात पक्षांतर्गत एवढे रामायण घडत असताना देखील बारामतीने मात्र हा दुरावा दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे कुठे दिसले नाही, काही का असेना राष्टÑवादी पक्ष मात्र दुहीच्या गर्तेत सापडला आहे.