चितेगाव येथे औद्योगिक वसाहत असल्याने येथील बाजारपेठ मोठी आहे. या आठवड्यात पैठण तालुक्यात कोरोना संसर्ग झालेल्या नागरिकांची संख्या वाढत असल्याने शुक्रवारी सकाळी उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, पैठणचे प्रभारी तहसीलदार दत्ता निलावड, गटविकास अधिकारी डी. एन. बागूल, नायब तहसीलदार संतोष अनर्थे, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर थोरे, मंडळ अधिकारी शशिकांत ठेंगे, तलाठी हसन सिद्दिकी, बिडकीन पोलीस ठाण्याचे सपोनि. संतोष माने, माजी सरपंच कडूबाळ नरवडे, पोहेकाॅ. बाळासाहेब लोणे, चितेगाव सरपंच शेख वाहेद, ग्रामसेविका बी.व्ही. राठोड आदींनी चितेगाव बाजारपेठ पिंजून काढली. सर्व दुकानदारांना कोविड तपासणी करण्यासाठी सक्ती केल्याने शुक्रवारी चितेगाव येथील बाजारपेठ दुपारपर्यंत बंद होती. जि.प. शाळेत सकाळपासून दुकानदारांनी तपासणीकरिता रांगा लावल्या होत्या. तपासणीनंतरच व्यवसायिकांनी आपली दुकाने उघडली. पैठणचे गटविकास अधिकारी, सरपंच व ग्रामसेविका यांनी शुक्रवारी अनेक दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली.
फोटो : चितेगाव येथे दुकानदारांना कोरोना तपासणीची सक्ती करताना उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, प्रभारी तहसीलदार दत्ता निलावाड, सपोनि. संतोष माने, सरपंच शेख वाहेद, तलाठी हसन सिद्दिकी आदी.
020421\20210402_105209_1.jpg
चितेगाव येथे दुकानदारांना कोरोना तपासणीची सक्ती करताना उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, प्रभारी तहसीलदार दत्ता निलावाड, सपोनि. संतोष माने, सरपंच शेख वाहेद, तलाठी हसन सिद्दीकी आदी.