शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

कोपर्डी निकाल : फाशीची तातडीने अंमलबजावणी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:42 IST

कोपर्डी घटनेतील नराधमांना मिळालेल्या फाशीच्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी करतानाच शिक्षा झालेले नराधम ज्या दिवशी फाशीवर लटकतील तीच पीडित मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तसेच मान्यवरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

औरंगाबाद : कोपर्डी घटनेतील नराधमांना मिळालेल्या फाशीच्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी करतानाच शिक्षा झालेले नराधम ज्या दिवशी फाशीवर लटकतील तीच पीडित मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तसेच मान्यवरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. राज्यात मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात औरंगाबादमधून झाली. त्यामुळे कोपर्डी खटल्याच्या निकालाकडे सर्व कार्यकर्ते आणि समाजबांधवांचे लक्ष होते. खटल्याचा निकाल आल्यावर आरोपींना झालेल्या शिक्षेबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले, तर विकृत मानसिकतेला यामुळे पायबंद बसेल, अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली.विकृतीला पायबंद बसेलकोपर्डीतील दुर्दैवी घटनेतील आरोपींना फाशी देऊन न्यायालयाने त्या कन्येला खरा न्याय दिला. महाराष्ट्रातील समाजमन ढवळून काढणाºया या घटेनतील क्रूर कृत्याबद्दल दिलेल्या निकालाने विकृत मानसिकता असलेल्या प्रवृत्तींना जरब बसेल; परंतु महिलांवरील अन्याय या समाजात सहन केला जात नाही. हा सामाजिक संदेश समाजात प्रभावीपणे जाईल. त्याचबरोबर यापुढे असल्या वाईट घटना घडताच कामा नये, यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत.-आमदार सतीश चव्हाणसंयम दाखविणे गरजेचेकोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाजाने मोठमोठे मोर्चे काढले. यानंतर आरक्षणाचा मुद्दा समोर आला. मराठा समाजाने न्यायव्यवस्थेवर पूर्णत: विश्वास ठेवला. दीड ते पावणेदोन वर्षे समाजाने दाखविलेल्या संयमाचे फळ आज मिळाले. कोपर्डीच्या घटनेतील दोषींना फाशी झाली म्हणून आनंद व्यक्त करण्याची आवश्यकता नाही. आरक्षणाच्या मुद्यावरही आता संयम दाखवणे गरजेचे आहे. तरच उज्ज्वल भविष्य आहे. संयमामुळे फायदाहोतो.- मानसिंग पवार, उद्योजक तथा समन्वयक मराठा क्रांती मोर्चान्याय मिळालाकोपर्डी प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशी देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत. न्याय मिळाला. संभाजी ब्रिगेडने सुरू केलेल्या लढ्याला यश.- डॉॅ. शिवानंद भानुसे,प्रदेश प्रवक्ता, संभाजी ब्रिगेडऐतिहासिक निर्णयकोपर्डीतील पीडितेवर अमानुष अत्याचार आणि तिचा खून करणाºया नराधमांना न्यायालयाने सुनावलेली फाशी हा ऐतिहासिक निर्णय. या निकालामुळे यापुढे असे कृत्य करण्यास कोणीही धजावणार नाही. मराठा क्रांती मोर्चाची पहिली मागणी कोपर्डीच्या नराधमांना फाशी द्या, हीच होती. न्यायालयाने जनभावनेचा आदर केला. आम्हीही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो.-अंबादास दानवे,शिवसेना जिल्हाप्रमुखन्यायालयाचे आभारआमच्या बहिणीवर पाशवी अत्याचार करणाºया नराधमांना शेवटी फाशी झालीच. पण ज्या दिवशी या नराधमांना फासावर लटकावण्यात येईल, तीच खरी श्रद्धांजली. यामुळे यापुढेही आमचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे. मराठा क्र ांती मोर्चाची नोंद घेऊन सरकारने जलद कारवाई केल्याबद्दल आणि अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे आभार. सरकारने समाजाच्या उर्वरित मागण्याही लवकर पूर्ण कराव्यात.- मनीषा वडजे, अध्यक्षा,छावा मराठा युवा संघटननिकालाने समाधानीया निकालाबद्दल आम्ही निश्चितच समाधानी आहोत; परंतु जोपर्यंत आरोपींना फासावर लटकावताना आम्ही पाहत नाही, तोपर्यंत आम्ही स्तब्ध बसणार नाहीत... आजचा हा निकाल आरोपींवरच नाही तर त्यांना साथ देणाºया सर्वांना जरब बसविणारा आहे. या निकालाची अंमलबजावणी तातडीने व्हावी एवढीच अपेक्षा आहे. सर्वच समाजातील महिलांच्या रक्षणासाठी नेहमीच सज्ज राहू.-रवी काळे पाटील, समन्वयक,मराठा क्रांती मोर्चामराठा समाजाच्या संघर्षाचा विजयकोपर्डीतील पीडितेवर अत्याचार करणाºयांना फासावर लटकावा, ही पहिली मागणी मराठा क्र ांती मोर्चाची होती आणि या मागणीसाठी राज्यातील पहिला मोर्चा औरंगाबादेत ९ आॅगस्ट रोजी काढण्यात आला. त्यानंतर राज्यभर मोर्चे निघाले. समाजाने वर्षभर दिलेल्या संघर्षामुळे पीडितेला न्याय मिळाला आणि न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील तपास यंंत्रणा, पोलीस खाते, साक्षीदार, सरकारी वकील उज्ज्वल निकम व न्यायालय यांचे आभार.- अप्पासाहेब कुढेकर, समन्वयक, मराठा क्र ांती मोर्चानिकाल अपेक्षितचतिन्ही नराधमांना न्यायालयाकडून फाशी सुनावली जाईल, या अपेक्षेप्रमाणे न्यायालयाने आज निर्णय दिला. मात्र आरोपींना लवकरात लवकर फाशी होईल, यासाठी यापुढील प्रक्रिया जलदगतीने व्हावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर आमचा विश्वास आहे. राज्यातील अन्य बलात्काराच्या घटनांमधील आरोपींनाही अशीच शिक्षा झाली पाहिजे.- रमेश गायकवाड, समन्वयक,मराठा क्रांती मोर्चाअखेर न्याय मिळालाकोपर्डीतील नराधमांना फाशी हीच शिक्षा योग्य होती. माननीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. कोपर्डीच्या ताईला न्याय मिळाला. या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता. भावनांचा उद्रेक होऊन आपल्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक मोर्चे निघाले. लोक एकवटले. त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाल्याने असे कृत्य करणाºया नराधमांवर वचक बसेल. या निर्णयामुळे पुरोगामी महाराष्ट्रात असल्या वाईट घटनांना चाप बसेल.-अभिजित देशमुख, समन्वयक,मराठा क्रांती मोर्चा२ाआजच्या निकालाने क ोपर्डीच्या ताईला न्याय मिळाला. मराठा क्र ांती मोर्चाचा व महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाचा विजय आहे. या निकालामुळे असे नीच कृत्य करणाºया नराधमांना जरब बसेल आणि ते असे कृत्य करण्यास धजावणार नाहीत. यापुढे कोठेही अशी घटना घडल्यास मराठा क्र ांती मोर्चा आवाज उठवेल.- रमेश केरे, समन्वयक,मराठा क्रांती मोर्चा२ाकोपर्डीच्या ताईवर अमानुष अत्याचार आणि तिचा खून करणाºया तिन्ही आरोपींना न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा, ही समाजाच्या एकीचा विजय आहे. अत्याचारानंतर १८ जुलै रोजी राज्यातील पहिली हिंसक प्रतिक्रिया देत आपण एस. टी. महामंडळाची बस फोडली होती. यानंतर आपल्याला अटकही झाली. समाजातील सहकाºयांनी आपल्या पाठीशी उभे राहून आपला जामीनही घेतला. मात्र राज्यभर आंदोलन पेटले. आपण ज्यासाठी जेलमध्ये गेलो त्याचे आज सार्थक झाले असे वाटते.-सुनील कोटकर, समन्वयक,मराठा मोर्चां२ाअत्याचारी तीन जणांना फाशीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाजातील सर्व स्तरातील लोकांनी विशेषत: तरुणांनी अत्यंत संयमाने आणि शांततेत आंदोलन केले. या घटनेनंतर मराठा समाजात आपुलकीची भावना वाढली. राज्यभर निघालेल्या मोर्चानंतर शासनाने हा खटला जलदगती न्यायालयात चालविल्याने अपेक्षेप्रमाणे आजचा निकाल लागला. शासनाने यापुढेही जातपात न पाहता अशा घटनांमधील आरोपींना लवकरात लवकर शासन होईल यासाठी त्यांचे खटले जलदगती न्यायालयात चालवावीत.- अ‍ॅड. स्वाती नखाते,समन्वयक, मराठा क्रांती मोर्चां२ाफाशीची शिक्षा झाली, पण अंमलबजावणी होईपर्यंत संभाजी ब्रिगेड पाठपुरावा करणार आहे. आमचा कायद्यावर विश्वास आहे. कोपर्डी प्रकरणाचा आणि इतर प्रकरणांचा कोणीही संबंध जोडू नये. आजचा निर्णय हे सर्व मराठा समाजाचे यश आहे. या निर्णयाने बलात्कारांच्या घटनांना आळा बसेल.- राहुल बनसोड, संभाजी ब्रिगेड