शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

कोल्हापुरी बंधाऱ्यांना घरघर

By admin | Updated: June 10, 2014 00:55 IST

लोहारा : सिंचन क्षमता वाढावी या उद्देशाने लोहारा तालुक्यातील १३ गावामध्ये ३३ कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आली.

लोहारा : सिंचन क्षमता वाढावी या उद्देशाने लोहारा तालुक्यातील १३ गावामध्ये ३३ कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आली. पण त्यावेळी बंधाऱ्याचे झालेले निकृष्ट काम, गायब झालेले गेट, दुरुस्तीसाठी निधी नसलेला निधी त्यामुळे कोल्हापुरी बंधाऱ्याला घरघर लागली असून, निर्मितीचा उद्देशही पाण्यात गेल्याचे दिसत आहे़लोहारा शहराच्या शिवारात ६, जेवळी ११, धानुरी, आष्टाकासार, तोरंबा, कास्ती (खुर्द) व अचलेर या गावात प्रत्येकी २ तर सास्तूर, माकणी, तावशीगड, हिप्परगा (रवा), कानेगाव, सालेगाव शिवारात प्रत्येकी १ असे एकूण तालुक्यात ३३ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधण्यात आलेले आहेत. यातील २८ बंधाऱ्याची कामे जि.प. कडून करण्यात आली आहेत. ३३ बंधाऱ्यासाठी १०५९ गेट बसविण्यात होती़ यामधील २६१ गेट गायब असल्याची तक्रार सरकारी दप्तरात आहे. पण प्रत्यक्षात मात्र जास्त गेट गायब आहेत. त्यात जेवळी परिसरात गेट चोरुन नेताना शेतकऱ्यांनीच एका चोरट्याला पकडल्याची घटना आहे. या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने गेले अनेक वर्षांपासून एक रुपयाची तरतूद केलेली नाही. त्यामुळे संबंधित विभाग मात्र त्या-त्या गावातील ग्रा.पं. व शेतकऱ्यांच्या सहभागातून असलेली गेट बसविले जातात.या ३३ कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे परिसरातील २९०१.२३ दलघमी पाणीसाठा उपलब्ध होवून त्यातून ९६६ हेक्टर जमीन ओलिताखाली येणे अपेक्षित होते. पण लाखो रुपये खर्च होवून बंधारे बांधण्याचा उद्देश मात्र सफल झाल्याचे दिसून येत नाही. यावर्षी ३३ कोल्हापुरी बंधाऱ्यापैकी पाच बंधाऱ्यासाठी गेट उपलब्ध झाले. पण गेट बसवणे हे लोकसभागातूनच होणार आहे. शासन विविध योजनाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करते. पण प्रत्यक्षात मात्र ज्याचा उपयोग शेतीसाठी होतो. त्यावर खर्च करण्यास मात्र कुचराईपणा केला जातो. यावरुनच हे स्पष्ट होते. (वार्ताहर)बंधाऱ्याची दुरूस्ती गरजेचीशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले आहेत़ मात्र, अनेक बंधाऱ्यांची दुरवस्था झाली असून, शेतकऱ्यांना याचा लाभ होत नाही़ त्यामुळे नादुरूस्त बंधारे दुरूस्त करून गेट बसवणे गरजेचे आहे़ त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल़ शिवाय आर्थिक उत्पन्नतही भर पडेल, असे शेतकरी सूर्यकांत बिराजदार यांनी सांगितले.लोकसहभागावर भरकोल्हापुरी बंधाऱ्यासाठी गत अनेक वर्षापासून निधीची मागणी करीत आहोत़ पण निधी मिळत नाही. यावर्षी ३३ पैकी पाच बंधाऱ्याला नवीन गेट आले आहेत. दरवर्षीप्रमाणे आम्ही याहीवर्षी लोकसहभागातून सर्वच बंधाऱ्यावर गेट बसणार आहेत, असे लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता ई.टी. सूर्यवंशी यांनी सांगितले.शेतकऱ्यांनीच निगराणी ठेवावीकोल्हापुरी बंधारे हे शासनाची मालमत्ता नसून ती आपलीच मालमत्ता आहे, असे समजून परिसरातील शेतकऱ्यांनी बंधाऱ्याची निगराणी केली पाहिजे. जेणे करुन गेट चोरीचे प्रमाण कमी होईल व गेट बसविल्यानंतर याचा फायदा आपल्याला होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनीच आता पुढे येण्याची गरज आहे. असे सास्तूर येथील शेतकरी किसन पवार यांनी सांगितले.