शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

भाजीपाला महागल्याने कीचन बजेट कोलमडले

By admin | Updated: July 23, 2014 00:30 IST

कडा : येथील बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे खरेदीसाठी आलेल्या गृहिणींचे कीचन बजेट कोलमडल्याचे दिसून येत आहे.

कडा : येथील बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे खरेदीसाठी आलेल्या गृहिणींचे कीचन बजेट कोलमडल्याचे दिसून येत आहे. आष्टी तालुक्यातील कडा शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजारपेठ आहे. यामुळे कडा येथे परिसरातील डोंगरगण, खिळद, देवळाली, धानोरा यासह आष्टी व नगर परिसरातील काही व्यापारी, शेतकरी येथे भाजीपाला विक्रीसाठी आणतात. कडा शहरात सर्वात मोठा बाजार भरत असल्याने येथे ग्राहकांची मोठी गर्दी असते. पावसाळा सुरू होऊन गेल्या दीड महिन्यात पाऊसच पडला नसल्याने याचे परिणाम बाजारावरही दिसून येऊ लागले आहेत. नदी- नाले, तलाव कोरडेठाक पडल्याने चक्क पाणी विकत घ्यायची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. शेतकऱ्यांचेही सध्या हाल सुरू आहेत. जनावरांनाही पाणी पाजण्यासाठी शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध नसल्याने भाजीपाल्यासह इतर पिकांचा तर प्रश्नच येत नाही. तालुक्यात अशी दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने बाजारावर याचा मोठा परिणाम झाला आहे. कडा शहरात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत असल्याने बाजारात सर्रास भाज्यांचे ढिगारे दिसून येत असत. मात्र सध्या शेतकऱ्यांकडे भाजीपाला नसल्याने बाजारातील भाज्यांची आवक कमालीची घटली आहे. यामुळे भाजीपाल्यांची महागाई ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या टोमॅटो ६० रुपये किलो, कोबी ४० रुपये किलो, पत्ता कोबी ६० रुपये किलो, बटाटे ३० रुपये किलो, वांगे २० रुपये किलो, मेथी जुडी १५ रुपये, पालक १० रुपये, कोथिंंबीर जुडी १० रुपये यासह इतरही भाजीपाल्याचे दर १०० रुपये किलो प्रमाणे आहेत.भाजीपाला महागल्याने १०० ते १५० रुपयांमध्ये लागणारा आठवड्याचा भाजीपाला आता ३०० रुपयांपर्यंत गेल्याचे जगन्नाथ भगत यांनी सांगितले. तर भाजीपाल्याचे विक्रेते नवनाथ तळेकर म्हणाले, यावर्षी अद्यापही पाऊस नसल्याने भाजीपाल्याच्या किमतीत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. भाजीपाल्याच्या महागाईची सर्वाधिक झळ महिलांना बसल्याचे दिसून येत आहे. यामुळे महिलांचे कीचन बजेटही कोलमडले आहे. कडा येथे बाजारासाठी मोठ्या प्रमाणावर महिला येत असतात. दर आठवडी लागणाऱ्या पैशांच्या प्रमाणात महिलांनी बाजारासाठी पैसे आणले होते. मात्र भाजीपाल्याचे भाव प्रचंड वाढल्याने महिलांना पुरेशी भाजीपाल्याची खरेदीही करता आली नाही. यामुळे काही महिला हिरमुसल्याचे दिसून आले.(वार्ताहर)दुष्काळ जाहीर करण्याची मागणीवांजरवाडा : अल्प पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या तर काहींचे खत व बियाणे घरीच आहे़ सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी द्विधा मन:स्थितीत सापडला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यास आर्थिक पाठबळ द्यावे, अशी मागणी तालुका विकास संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदारांकडे सोमवारी केली आहे़ वांजरवाडा परिसरातील शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरली. मात्र पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हतबल झाला आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.