शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

‘सायलंट किलर’चा विळखा वाढतोय

By admin | Updated: November 25, 2014 00:57 IST

उस्मानाबाद : मानवी शरिरासाठी ‘सायलंट किलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधुमेहासह उच्च रक्तदाब, ह्दयरूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे़

उस्मानाबाद : मानवी शरिरासाठी ‘सायलंट किलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधुमेहासह उच्च रक्तदाब, ह्दयरूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे़ हे आजार जडण्यामागे मानवी जीवनात झालेले बदल कारणीभूत आहेत़ मानवी शरिराला जखडत असलेल्या ‘सायलंट किलर’ आजारांच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांनी ‘फास्टफूड’ टाळण्यासह व्यायम, योगावर करण्यावर भर देणे ही काळाची गरज बनल्याचे आयुर्वेदिक महाविद्यालयातील डॉ़ मयुर देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़डॉ़ देशमुख म्हणाले, स्पर्धेच्या युगात मानवाचे जीवनमान वेगाने बदलत आहे़ कामाचा वाढता ताण, अवेळी होणारे जेवण, फास्टफूडची लागलेली सवय आदी कारणांमुळे मानवी शरिरातही मोठे बदल होवू लागले आहेत़ अनेकांनी व्यायाम, योगा यांकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याने शरिराची स्थुलता वाढू लागली आहे़ त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्दयाच्या आजारासह इतर आजारांनी शरिराला जोखडून ठेवले आहे़ देशात सद्यस्थितीत १८ जणांमागे एका इसमास मधुमेह असल्याचा अहवाल असून, ही आकडेवारी २०३० मध्ये तिघांमध्ये एक रूग्ण अशी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ आयुर्वेदिक महाविद्यालयात या आजारांनी ग्रस्त रूग्ण उपचारासाठी दाखल होतात़ किंवा इतर आजारामुळे करण्यात येणाऱ्या तपासणीतून हे आजार झाल्याचे समोर येते़ येथे येणाऱ्या रूग्णांपैकी ५० टक्क्यांच्या जवळपास हेच रूग्ण आहेत़ तर देशात सद्यस्थितीत मधुमेहामुळे ६़२३ टक्के, उच्च रक्तदाबामुळे १५़९ टक्के तर ०़१५ जणांचा ह्दयाच्या झटक्याने मृत्यू होत आहे़ हे प्रमाण पाहता शासनाकडून असंसर्ग जन्य रोग प्रतिबंधात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे़जिल्ह्यात या मोहिमेंतर्गत जिल्हा रूग्णालयासह ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालयात उच्च रक्तदाब, मधुमेह, ह्दयरूग्ण, कर्करोग आदींच्या विविध तपासण्या करून रूग्णांना मोफत औषधोपचार करण्यात येत आहेत़ जिल्ह्यात आॅगस्टपासून ही मोहीम सुरू करण्यात आली असून, आजवर करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये ४१८ मधुमेहाचे तर तब्बल १०८९ उच्च रक्तदाबाचे रूग्ण आढळून आले आहेत़ मधुमेह, उच्च रक्तदान आणि ह्दयरोग हे सायलंट किलर म्हणून ओळखले जावू लागले आहेत़ यापैकी एकाखाही आजार जडल्यानंतर योग्य उपचार घेतले नाहीत तर इतर दोन्ही आजारही संबंधितांना जखडण्याची शक्यता आयुर्वेदिक रूग्णालयातील डॉ़ मयुर देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ शिवाय इतर रूग्णालयातील औषधे सुरू केलेल्या रूग्णांना आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रारंभी आहारातील बदल व पथ्य सांगितले जातात़ त्यानंतर काही महिन्यांनी तपासणी करण्यात येते़ तपासणी अहवालानंतर आवश्यकता वाटली तर संबंधितांना औषधे दिली जातात़ दरम्यान, आजार जखडल्यानंतर मानवाला आयुष्याच्या शेवटपर्यंत अनेक पथ्य-पाण्यासह औषधांवरच जीवन कंठावे लागत आहे़ एकूणच, स्पर्धेच्या युगात मानवी जीवन बदलले असले तरी त्याचा फटका मात्र मानवालाच सहन करावा लागत असल्याचे दिसत आहे़ त्यामुळे आजार टाळण्यासाठी वेळेवर जेवण आणि दररोज व्यायाम याला पर्याय नाही़ (प्रतिनिधी)