उस्मानाबाद : शौचास गेलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी एकाविरूध्द उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास आळणी येथे घडली़याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आळणी येथील एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी बुधवारी रात्रीच्या सुमारास शौचास गेली होती़ ती घरी परत आली नसल्याने घरच्यांनी तिचा शोध घेवूनही ती सापडली नाही़ गावातीलच एकाने त्या मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद पीडित मुलीच्या नातेवाईकांनी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली़ दरम्यान, सदरील फिर्यादीमध्ये संशयित म्हणून अजित उर्फ लाल्या वीर (रा़आळणी) याचे नाव नमूद करण्यात आले आहे़ त्यावर उपरोक्त फिर्यादीवरून पोलिसांनी अजित वीर याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे़ सदरील घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जिरगे हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)
पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण
By admin | Updated: May 8, 2015 00:26 IST