शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

खरिपाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:39 IST

जिल्ह्यात १७ जूननंतर मोठा पाऊस झालेला नाही. ढगाळ वातावरण व हलक्या पावसामुळे पिकांना कसेबसे जीवनदान मिळाले. मात्र, आता कडक ऊन पडण्यास सुरुवात झाली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात १७ जूननंतर मोठा पाऊस झालेला नाही. ढगाळ वातावरण व हलक्या पावसामुळे पिकांना कसेबसे जीवनदान मिळाले. मात्र, आता कडक ऊन पडण्यास सुरुवात झाली असून, जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. परिणामी पिके सुकली आहेत. याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे. कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार खरिपाचे उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील पीक परिस्थिती व हवामानाचा १० आॅगस्टपर्यंतचा अहवाल कृषी विभागने तयार केला आहे. जालना, अंबड, घनसावंगी व बदनापूर तालुक्यातील पिकांची स्थिती पावसाअभावी अत्यंत बिकट झाली आहे. आठवडाभरापूर्वी चांगल्या स्थितीत असलेली भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील पिके सुकली आहेत. पाऊस नसल्याचा सर्वाधिक फटका मूग व उडीद पिकास बसला आहे. उडिदाचे पीक फुलोºयाच्या अवस्थेत असून, मूग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. दोन्ही पिकांचे उत्पादन पन्नास टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. तुरीच्या ५३ हजार ६७८ हेक्टवरील पिकाची वाढ खुंटली आहे. सरासरीच्या १६१.३ हेक्टरवर पेरणी झालेले सोयाबीन फुलोºयाच्या अवस्थेत असून, त्यावर उंट अळी व चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव आहे. तूर व सोयाबीनचे उत्पादन २५ ते ५० टक्के घट अपेक्षित आहे. बागायती कापसाचे पीक वाढीच्या अवस्थेत असून, कोरडवाहू कापसाची वाढ खुंटली आहे. ठिबकच्या मदतीने विहिरीतील अल्प पाण्यावर कापूस पीक जगविण्यासाठी शेतकºयांची धडपट पाहावला मिळत आहे. बाजरी व मका पिकाची स्थिती अत्यंत नाजूक आहे. यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतकºयांनी मोठ्या उत्साहाने पेरणी व लागवडीचे कामे सुरू केली. सुरुवातीला काही भागात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने मशागतींच्या कामांना वेग आला होता. शेतकºयांनी आतापर्यंत बी-बियाणे, खते, औषधी यावर मोठा खर्च केला आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्याने हा सर्व खर्च वाया जाण्याची शक्यता आहे.