शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
4
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
5
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
6
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
7
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
8
"ही कुणाची चप्पल घातलीस?" आईने बदललेली चप्पल विचारताच गतिमंद मुलीने सांगितला झालेल्या अत्याचाराचा थरार !
9
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
10
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
11
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
12
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
13
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
14
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
15
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
16
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
17
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
18
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
19
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
20
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा

कदमांच्या कार्यक्रमात खैरे यांची गैरहजेरी

By admin | Updated: February 14, 2015 00:12 IST

औरंगाबाद : देवळाई चौक ते देवळाईपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते पार पडले.

औरंगाबाद : देवळाई चौक ते देवळाईपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. चंद्रकांत खैरे राहणार होते. परंतु ते अनुपस्थित होते. गेल्या दोन ते तीन कार्यक्रमांत रामदास कदम यांच्याकडून झालेल्या शाब्दिक हल्ल्यामुळे खा. खैरे यांनी या कार्यक्रमास गैरहजर राहण्यास प्राधान्य दिले, अशीच चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती.देवळाई चौकात आयोजित भूमिपूजनाच्या कार्यक्रमास आ. संजय शिरसाट, शिवसेनेचे संपर्क नेते विनोद घोसाळकर, आ. हर्षवर्धन जाधव, अंबादास दानवे, जि. प. सदस्या योगिता रमेश बाहुले, अनिता राजेंद्र राठोड, रेणुकादास वैद्य, नंदकुमार घोडेले आदी उपस्थित होते. ‘एमआयएम’ला उत्तर देणारमनपा निवडणुकीच्या माध्यमातून जेव्हा समोर येईन, तेव्हा माझे विचार मांडेन आणि ‘एमआयएम’ला चोख उत्तर देणार असे रामदास कदम म्हणाले. आधीचे पालकमंत्री साताऱ्यात एकदाही आले नसून आपण पहिले पालकमंत्री असल्याचेही ते म्हणाले. यावेळी आपण दाऊदच्या मतदारसंघातून निवडून आल्याचाही त्यांनी उल्लेख केला.२०-२० लाखांना हारकार्यक्रमादरम्यान परिसरातील रस्त्यांसाठी १ कोटी रुपये जाहीर करून टाका, असे कदमांना सांगण्यात आले. ते म्हणाले की, त्यानंतर कळाले की इतक्या मोठमोठ्या फुलांच्या माळा का टाकल्या? आधी खुश करायचे आणि हळूच पैसे मागायचे. म्हणजे २०-२० लाखांना एक हार पडत असल्याचे दिसते.शिवाय १ कोटीच द्या म्हणतात. मी २ कोटी दिले तर काय अडचण येणार आहे, असेही ते म्हणाले.मी मुंबईत बैठकीलाखा. खैरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘बीएसएनएल’च्या संदर्भात खासदारांची मुंबईत बैठक होती. म्हणून मी मुंबईला गेलो होतो. बैठकीला ‘बीएसएनएल’चे १५० अधिकारी उपस्थित होते.