लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जो चेंबूरच्या चित्रपटगृहाबाहेर तिकिटे विक्री करीत होता. त्याला बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे सर्व पदे उपभोगायला मिळाली. या पदांच्या साहाय्याने भ्रष्टाचारातून अमाप माया जमवणा-या नारायण राणे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याची टीका शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली.राज्यात वाढलेली महागाई आणि जीएसटीमुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत आला आहे. याविरोधात शिवसेना महिला आघाडीतर्फे सोमवारी सकाळी ११ वाजता क्रांतीचौकात निदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात महिला आघाडीसह शिवसेना नगरसेवकांची सुभेदारी विश्रामगृहात बैठक झाली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खैरे यांनी शिवसेनेला टार्गेट करणारे नारायण राणे यांच्यावर खरमरीत टीका केली. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या म्हणण्यानुसार कोंबडीचोर चपराशाला मुख्यमंत्री केले. तरीही शिवसेनेशी गद्दारी केली. काँग्रेसमध्ये गेल्यावरही तेथेही तेच केले. राणे हे हस्तक आहेत. त्यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी प्रयत्न केले; मात्र भाजपवाल्यांनी का घेतले नाही? पैशाच्या जीवावर सर्व काही करता येते या भ्रमात राणे यांनी राहू नये, दोन वेळा शिवसेनेने पराभूत केल्याची आठवण ठेवावी. तरीही भाजपने प्रवेश न दिल्यामुळे ते सुद्धा अभिनंदनास पात्र असल्याचे खैरे यांनी सांगितले.
भ्रष्ट राणेकडून टीका हा विनोदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:51 IST