शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक आहारच खºया अर्थाने आरोग्याची गुरुकिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:24 IST

आपला पारंपरिक आहारच खºया अर्थाने आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असा मोलाचा सल्ला आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकर यांनी दिला.

औरंगाबाद : ‘उंच- सडपातळ बांधा’ यासारखी नफेखोर कंपन्यांनी निर्माण केलेली सौंदर्याची प्रतीके मनावर बिंबवून आपण आपल्या पारंपरिक आहारापासून दूर जात आहोत. तूप, मीठ, साखर, स्थानिक खाद्यपदार्थ टाळून आपण सलाद, किनोआ, सूप अशा विदेशी अन्नपदार्थांचे सेवन करीत आहोत. मात्र, आपल्या पूर्वजांच्या अफाट ज्ञानातून तयार झालेला आपला पारंपरिक आहारच खºया अर्थाने आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असा मोलाचा सल्ला आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकर यांनी दिला.‘वाईडर आॅपॉर्च्युनिटीज् फॉर वूमेन’ (वॉव) या संस्थेच्या वतीने रविवारी (दि.२४) प्रेसिडेंट लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ‘सखी मंच’च्या संस्थापक अध्यक्षा आशू दर्डा आणि ‘वॉव’च्या संस्थापक अध्यक्षा रुचिरा दर्डा उपस्थित होत्या.करिना कपूर व आलिया भटसह सिनेक्षेत्रातील अनेक आघाडीच्या सेलिब्रिटींच्या आहारतज्ज्ञ म्हणून ऋतुजा काम करतात.भारतीय आहाराचे महत्त्व विशद करताना त्यांनी तुपाविषयीचे अनेक गैरसमज खोडून काढले. तुपाअभावी व्हिटॅमिन ‘डी’ कमी होते, ज्यामुळे भूक न लागणे, चीडचीड वाढणे, झोप न येणे, मासिक पाळी अनियमित होणे, थायरॉइडच्या समस्या, सततचे आजारपण, केस गळती अशा समस्या सुरू होतात. यावर उपाय म्हणजे रोजच्या जेवणात तूप असायलाच हवे, अशी माहिती त्यांनी दिली.‘पूर्वी एखाद्या घराची श्रीमंती तेथील तूप आणि दुग्धजन्य पदार्थांवरून ठरविली जाई. मात्र, विदेशी अन्न कंपन्यांनी भारतीय खाद्यपदार्थांचे महत्त्व कमी केले; परंतु आता जगालादेखील भारतीय आहारशास्त्राचे महत्त्व कळाले आहे. आपली आजी हीच सर्वात हुशार ‘डाएटिशन’असते. तिच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका, असा संदेश दिवेकर यांनी दिला.