शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

केबीसीने घातला कोट्यवधींचा गंडा

By admin | Updated: July 16, 2014 00:46 IST

विजय चोरडिया, जिंतूर अल्पावधित दाम दुप्पट देण्याचे आमिष दाखवून जिंतूर तालुक्यातील शेतकरी व कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून केबीसी कंपनीने गाशा गुंडाळला आहे़

विजय चोरडिया, जिंतूरअल्पावधित दाम दुप्पट देण्याचे आमिष दाखवून जिंतूर तालुक्यातील शेतकरी व कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून केबीसी कंपनीने गाशा गुंडाळला आहे़ यामुळे हजारो गुंतवणूकदारांचे पैसे मात्र अडकून पडले आहेत़ मागील दोन वर्षांपासून केबीसीने जिंतूर तालुक्यात जोरदार मार्केटींग केले़एजंटांची साखळी निर्माण करून ग्रामीण भागापर्यंत एजंटांचे जाळे नेमले़ १७ हजार २०० रुपयांत ५१ हजार रुपये मिळवा किंवा ८६ हजारांत ३ लाख ६ हजार रुपये मिळवा, असे अमिष दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित केले़ तालुक्यामध्ये ४० ते ५० एजंट असून, १ हजारापेक्षा जास्त लोकांनी कंपनीत गुंतवणूक केली आहे़ हा आकडा १० कोटीपेक्षा जास्त आहे़ १ महिन्यापूर्वी केबीसीने गाशा गुंडाळला हे जवळपास निश्चित झाले होते़ तेव्हापासूनच गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास कमी झाला़ परंतु, एजंटांनी गुंतवणूक करताना वेगवेगळी आमिषे दाखविली़ काही एजंटांनी स्वत: जबाबदारी घेऊन पैसे बुडाले तर परत करू असे आश्वासन दिले होते़ यामुळे लोकांनी विश्वास ठेऊन कोट्यवधी गुंतवले़ याचाच परिणाम कंपनीला मोठ्या प्रमाणावर रक्कम मिळाल्याने ही रक्कम घेऊन कंपनीचे मुख्य संचालक व अन्य पसार झाले आहेत़ विशेषत: तालुक्यातील ग्रामीण भागापर्यंत केबीसीचे जाळे पोहचले आहे़ प्रत्येक गावातून किमान २० त २५ नागरिकांनी यात गुंतवणूक केली़ काहींनी घरातील किडूनमिडूक विकून तर काहींनी दागिने गहान ठेऊन तर काहींनी व्याजबट्टयाचे पैसे शेती गहान ठेऊन काढले व केबीसीत गुंतवले़ केबीसीने आता पोबारा केल्यामुळे या नागरिकांपुढे कर्ज फेडण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे़एजंट आले गोत्यात तालुक्यातील नागरिकांनी कंपनीत पैसे गुंतविताना एजंटाच्या भरोस्यावर गुंतवणूक केली होती़ गुंतवणुकीच्या वेळी एजंटांनी पैसे परत करण्याचे आमिष संबंधितांना दिले होते़ आता कंपनी बुडाल्याने गुंतवणूकदार एजंटाच्या दारात खेटे घालत आहेत़ एजंटांनी गुंतवणूकदारांना आमिष दाखविल्यानेच कोट्यवधी रुपयांना गुंतवणूकदार बुडाले आहेत़ गुंतवणुकीत महिलांचे प्रमाण जास्तकेबीसी कंपनीत ज्या गुंतवणूकदारांनी रक्कम गुंतवली़ त्यात महिलांचे प्रमाण मोठे आहे़ अनेक महिलांनी घरच्या मंडळींना अंधारात ठेऊन गुंतवणूक केली तर काहींनी स्वत:चे दागिने परस्पर ठेऊन कंपनीत पैसे भरले़ कंपनी बंद पडल्याने या महिलांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे़